vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिहारच्या नव्याने शपथ घेतलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

बिहारच्या नव्याने शपथ घेतलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

राज्यात प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीतीश कुमार यांचे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.नीतीश कुमार हे अनेक वर्षांपासून सुशासनाचा सिद्ध अनुभव असलेले एक अनुभवी प्रशासक आहेत असे सांगून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनाही बिहारचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.या दोन्ही नेत्यांनी जनतेची सेवा करताना स्थानिक पातळीवर व्यापक काम केले आहे असे नमूद करत त्यांना उत्तम कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

मोदी यांनी बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. समर्पित नेतृत्वासह बिहारला नव्या उंचीवर नेणारा हा संघ आहे, असे म्हणत मोदी यांनी उज्ज्वल यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

एक्स या समाज माध्यमांवरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,

“नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. ते एक कुशल आणि अनुभवी प्रशासक आहेत. राज्यातील सुशासनाचा त्यांचा उत्कृष्ट इतिहास आहे. त्यांच्या नव्या कार्यकाळासाठी त्यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

00000

संबंधित पोस्ट

त्‍या’ निर्णयाविरोधात विमाशि संघाचे धरणे आंदोलन१ फेब्रुवारी २०२५ रोजी बोर्ड कार्यालयासमोर निदर्शने

vishwatmaklokswamivarta

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख…

कौटुंबिक समस्यांवर चर्चा, तोडग्या साठी,कौटुंबिक न्यायालयाकडून मार्गदर्शन- न्यायाधीश संजश्री घरत-कौटुंबिक न्यायालय कायदा कार्यकम संपन्न

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ३.०’ चा तिसरा टप्पा सुरू; सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगारांची सुवर्णसंधी

हातभट्टी विरोधी मोहिमेला वेग, दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

बसस्थानक मार्गावर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात यावा.पीसीएम जालनाची मनपा आयुक्तांंकडे मागणी

vishwatmaklokswamivarta