vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक      – जिल्हाधिकारी अशोक काकडे

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक      – जिल्हाधिकारी अशोक काकडे

        सांगली, प्रतिनिधी : नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींची निवडणूक होत आहे. या अनुषंगाने निवडणूकविषयक सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी दिली.

       जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश 2025 संदर्भातील अधिसूचनेनुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना समान संधी मिळण्याकरिता निवडणूकविषयक सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

       जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यूट्युब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खाजगी एफएम वाहिन्या, सिनेमागृहे, सार्वजनिक ठिकाणचे दृकश्राव्य फलक, (ऑडिओ व्हिज्युअल डिस्प्ले), ई वृत्तपत्रे, बल्क एसएमएस किंवा व्हॉईस एसएमएस, समाजमाध्यमे, संकेतस्थळे इत्यादि प्रकारच्या सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींचे प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. तरी उमेदवारांनी सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन केल्यानंतरच जाहिरात प्रसारित करावी. जाहिरातीच्या प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज व अन्य अनुषंगिक माहितीसाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील माध्यम कक्षाशी संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

तातडीच्या उपचारामुळे दीड वर्षाच्या अनुजला मिळाले जीवदान**स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे होतेय कौतुक*

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा- हवामान विभागाचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

सीआयआयच्या ‘आंतरराष्ट्रीय शिखर परिषदे’मध्ये राज्याच्या प्रगतीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

आंदोलन कोण करायचे हेही सरकार ठरवणार का?राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून निषेधमराठा आरक्षणाच्या मागणीवरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापलेपोलिसांनी नोटीस बजावत आंदोलनाची परवानगी नाकारत बळजबरीने ताब्यात घेतले_

तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी बालकांना सुट्टी देण्याची आयोगाची शिफारस पोषण आहाराची पर्यायी व्यवस्था करा; बालहक्क संरक्षण आयोगाचे महिला व बालकल्याण विभागाला निर्देश,बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती..

छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी- एक वृक्ष उपक्रमपर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन, सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta