vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवमय वातावरणात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन उत्साहात साजरा◾ छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव…

शिवमय वातावरणात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन उत्साहात साजरा◾ छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव…

सातारा, प्रतिनिधी: ढोल ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची महापूजा करण्यात आली. पुजारी शंकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले.

भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.

आई भवानीची आरतीनंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरु झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, दरे, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुताऱ्या, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.

पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर पुतळ्यास व पालखीस पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी ‘क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज….,’ या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. शिवपुतळ्यासमोरील चबुतऱ्यावरील भगव्याचे ध्वजारोहण जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. शाहीर संभाजी जाधव आणि सहकाऱ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला.

छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी लहान मोठ्या विद्यार्थ्यांसह लाठी काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, महाबळेश्वर तहसिलदार सचिन मस्के, वाडा कुंभरोशीच्या सरपंच ज्योती सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक, विद्यार्थी- विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

ग्रामीण रस्त्यांची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे जामखेड तालुक्यातील दौंडाचीवाडी-तरडवाडी व वंजारवाडी-तित्रंज रस्त्यांचे भूमिपूजन

शरीर सुदृढ असेल तरच उत्तम प्रशासन घडेल – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ​लोणी – शिर्डी येथे जलसंपदा विभागाच्या पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांची गॅस एजन्सीला भेट; ग्राहकांशी संवाद गॅस वितरणाचा दैनंदिन आढावा, अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशनच्या पाईपलाईनमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेर सर्वेक्षण करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेस प्रारंभ   बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्रतापी पुनर्भरण व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प देईल शेतीला शाश्वत पाणी..