vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्या सतर्कतेमुळे-मुरबाड मध्ये दोन बालविवाह थांबवण्यात यश

प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्या सतर्कतेमुळे-मुरबाड मध्ये दोन बालविवाह थांबवण्यात यश

ठाणे, प्रतिनिधी) :- दि.23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 दरम्यान कंट्रोल चाईल्ड हेल्पलाईन (1098) पुणे येथून 16 वर्षाच्या दोन मुलींचा बाल विवाह 24 नोव्हेंबर 2025 होणार असल्याच्या संदर्भात अशी माहिती मिळाली. त्यांचे लग्न उद्या असून आज सायंकाळी 7 वाजता हळद आहे. त्याप्रमाणे त्यांची सविस्तर माहिती मिळविण्यात आली. याबाबत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांना माहिती तातडीने देण्यात आली असता त्यांनी या संदर्भात संरक्षण अधिकारी आणि सामाजिक संस्था यांची मदत घेण्यास सांगितल्या प्रमाणे त्यांना कळविण्यात आले. त्याप्रमाणे आपण याबाबत सर्वांना कळवून मुरबाड पोलीस स्टेशन या ठिकाणी लेखी माहिती देऊन त्यांच्या मदतीने दिलेल्या ठिकाणी चाइल्ड हेल्प लाईनचे जिल्हा समन्वयक, स्थानिक पोलीस विभाग, पोलीस पाटील, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट आणि सेवा संस्था यांनी तात्काळ कार्यवाही करण्यास पोहोचलो असता त्या ठिकाणी बालिका घरी नव्हत्या आम्ही जाण्यापूर्वी त्यांनी हळद थांबविली होती. प्रथम आपण त्याच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांना असे सांगितले की, आपल्या बालिकेचे वय हे 18 वर्षे पूर्ण नसल्यामुळे आपण तिचा विवाह करू शकत नाही आणि जर तसे झाले असते तर आपणास बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याप्रमाणे त्याच्या पालकांनी संमती दर्शवली की, आम्ही आमच्या मुलीची लग्न 18वर्ष पूर्ण होईपर्यंत लावणार नाही. तसेच यासंदर्भात बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष मॅडम यांना फोनद्वारे बालविवाह विषयी माहिती दिली असता त्यांनी फोनवर पालकांशी संवाद साधला पालकांचे व बालकीचे समुपदेशन केले आणि त्यांना बाल कल्याण समिती समोर दि.24 नोव्हेंबर 2025 रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये बालविवाह मुक्त महाराष्ट्र – आपला संकल्प अभियान आणि भारतभर बालविवाह मुक्त भारत अभियान सुरु आहे. ही मोहीम 100 दिवसीय असणार आहे. आक्टोंबर ते 26 जानेवारी 2026 पर्यंत चालू आहे.

अश्या प्रकारे बालविवाह होत (होणार) असल्यास किंवा बालकांचे शोषण होत असल्यास नागरिकांनी त्वरित 1098 या चाईल्ड हेल्पलाईन संपर्क क्रमांकावर संपर्क करावा, असे महाराष्ट्र राज्य पुणे महिला व बाल विकास आयुक्तालय सह आयुक्त राहुल मोरे यांनी कळविले आहे

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहनबचत ही काळाची गरज असून वेतनातील 20 टक्के रक्कमेची गुंतवणूक करा

शिष्यवृत्तीचे अर्ज 15 जून पर्यंत भरण्याचे आवाहन…

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

गडचिरोली पॅटर्न: ‘घाटो कट्टा’च्या माध्यमातून महिला होणार आत्मनिर्भर; सहपालकमंत्र्यांच्या हस्ते ६ फिरत्या रेस्टॉरंटचे लोकार्पण

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ही-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी, चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न