vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

७ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये संविधान जनजागरण परिषदेचे आयोजन

७ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये संविधान जनजागरण परिषदेचे आयोजन

छ. संभाजीनगर / प्रतिनिधी‘आम्ही भारताचे लोक’च्या वतीने भारतीय संविधान दिन, संविधान अंमलबजावणी दिन यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी संविधान जनजागरण परिषदेचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मसाप, रॉक्सी सिनेमाजवळ, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दुपारी १२:३० वाजता होणार आहे.

 या परिषदेचे उद्घाटक सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. महमूद प्राचा (नवी दिल्ली) हे करणार आहेत. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माजी जिल्हा न्यायाधीश अ‍ॅड. प्रकाश परांजपे (छत्रपती संभाजीनगर) हे राहणार आहेत. या परिषदेमध्ये प्रमुख वक्ते ज्येष्ठ निर्भीड पत्रकार निरंजन टकले (नाशिक) नागपूर येथील उच्च न्यायालयाचे खंडपीठाच्या विधिज्ञ अ‍ॅड. स्मिता कांबळे हे राहणार आहेत.

या परिषदेचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी कार्यकारी अभियंता इंजि. अशोक येरेकर हे आहेत. या परिषदेला उपस्थिती म्हणून अ‍ॅड. के.ई. हरिदास, न्या. डी.आर. शेळके, कॉ. किशोर ढमाले, अ‍ॅड. धनंजय बोरडे, डॉ. मच्छिंद्र गोर्डे, डॉ. ऋषीकेश कांबळे, साथी सुभाष लोमटे, डॉ. वासुदेव मुलाटे, कॉ. भीमराव बनसोड, प्रा. राम बाहेती, सुभाष महेर, प्रा. एच.एम. देसरडा, सुभेदार मेजर सुखदेव बन, अ‍ॅड. एस.आर. बोदडे, डॉ. शेख इक्बाल मिन्ने, अ‍ॅड. वैशाली डोळस, सतिश चकोर, डॉ. प्रमोद दुथडे, इंजि. चंदशेखर शिखरे, इंजि. महेश निनाळे, डॉ. एन.जी. नरवडे, अ‍ॅड. सुभाष सावंगीकर, बी.के. आदमाने, अ‍ॅड. डी.व्ही. खिल्लारे, या संविधान जनजागरण परिषदेला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संयोजक संविधान विश्लेषक अनंत भवरे आणि प्रा. भारत सिरसाट यांनी केले आहे.

 या परिषदेच्या यशस्वीतेसाठी रतनकुमार साळवे, कॉ. अभय टाकसाळ, डॉ. जनार्दन पिंपळे, डॉ. फारूक खान, अतकरे बापू, सविता अभ्यंकर, अरविंद खैरनार, रविंद्र तायडे, कॉ. मधुकर खिल्लारे, वसुधा कल्याणकर, दैवशाला गवंदे, डॉ. समाधान इंगळे, सुनिता शिंदे, इंद्रकुमार जेवरीकर, जितेंद्र भवरे, वजिर शेख, खालीद अहेमद, डॉ. धोंडोपंत मानवतकर, सुधाकर निसर्ग, भाऊ पठाडे, डॉ. अरूण कांबळे, ग.ह. राठोड, राजानंद सुरडकर, अन्वर शेख, बापुराव कांबळे, सतिश काळे, लिला ठोके, मधुकर गवंदे, शेख पाशुभाई, नौशाद उस्मान, डॉ. उमाकांत राठोड, रंजन दाणी, रवी वासाटे, नामदेव जिंदे, रमेश तेले, डॉ. बालाजी गिमेकार, विजय बहादुरे, अ‍ॅड. जयश्री भगत, पूनम पाटील, रामचंद्र वानखेडे आदी परिश्रम घेत आहेत

संबंधित पोस्ट

दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई कारवाईत अंदाजे 50 लाखांचा मुद्देमाल नष्ट

ग्रामीण रस्त्यांची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे जामखेड तालुक्यातील दौंडाचीवाडी-तरडवाडी व वंजारवाडी-तित्रंज रस्त्यांचे भूमिपूजन

कराड चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम 15 डिसेंबर आधी पूर्ण करा*-पालकमंत्री शंभूराज देसाई*

जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत,सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादामुळेच मला केंद्रीयमंत्री पदाची संधी मिळाली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

मुंबईतील वांद्रे येथे अरुणोदय वॉकर असोशियन तर्फे वरिष्ठ नागरिकांना करिता 12 जानेवारीला चालण्याची स्पर्धा…