
प्रशासन हे सुशासन करण्यात ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी
यांचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्रशासन हे पारदर्शक आणि लोकाभिमुख करून ते सुशासन करण्यासाठी संवाद कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले. कन्नड येथील डीडीएल लॉनवर ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचे एक दिवसीय उपविभागीय स्तरावरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सेवा हमी आयुक्त श्री किरण जाधव,कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, मार्गदर्शक सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर ,खुलताबाद तहसीलदार स्वरूप कंकाळ, डॉ.शोएब मोहम्मद डॉ.उल्फत परदेसी, डॉ. मेघा शेवगण तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.



