vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा -बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा -बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

नांदेड, प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नांदेड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत – १०० दिवसांचे अभियान अंतर्गत आज शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील सर्व शासकीय कार्यालये तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली.

बालविवाह समूळ उच्चाटन करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, बालविवाहामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे बालविवाह प्रतिबंध ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

बालविवाहाबाबत माहिती मिळाल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शपथविधी कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कैलास तिडके तसेच सर्व शाखांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.तसेच याच अनुषंगाने नांदेड शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्येही बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली.

०००००

संबंधित पोस्ट

शासकीय योजनांचा उद्देश सफल व्हावा – खासदार नामदेव किरसान-दिशा समितीच्या आढावा 

बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..! विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 30 प्रकरणांना मंजुरी

राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी अभियान उपयुक्त – आदिती तटकरे यांचे आवाहन,मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त 28 शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

ना. छगन भुजबळ यांच्याशी चर्चेची तयारी.!डॉ. संजय लाखेपाटी ल राज्य समन्वयक सकळ मराठा समाज आणि  मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र

vishwatmaklokswamivarta