vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या गैरवापरावर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाचा 24×7 कार्यरत नियंत्रण कक्ष

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या गैरवापरावर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाचा 24×7 कार्यरत नियंत्रण कक्ष…

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्रात होणाऱ्या 2025–26 मधील आगामी महानगरपालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या ताकदीच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी मुंबई आयकर विभागाने 24×7 कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मुक्त व निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेची शुचिता कायम राखण्याच्या उद्देशाने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा नियंत्रण कक्ष आयकर विभागाच्या निवडणूक निरीक्षण यंत्रणेचा एक भाग म्हणून कार्य करेल आणि आदर्श आचारसंहिता लागू असलेल्या संपूर्ण कालावधीत कार्यरत राहील.

हा नियंत्रण कक्ष राज्यातील जागरूक नागरिक व रहिवाशांना निवडणूक प्रचारादरम्यान बेहिशेबी रोख रक्कम, मौल्यवान वस्तू किंवा इतर प्रलोभनांच्या वापराबाबत माहिती देऊन सावधान करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. नागरिक व्हॉट्सॲप, मोबाईल संदेश किंवा दूरध्वनीद्वारे 7738113758या क्रमांकावर अथवा mumbai.addldit.inv8@incometax.gov.in या ई-मेल पत्त्यावर माहिती पाठवू शकतात. हा नियंत्रण कक्ष, कक्ष क्रमांक 316, तिसरा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001 इथे आहे. पैशांच्या ताकदीचा गैरवापर रोखण्यासाठी विश्वासार्ह माहितीसंदर्भात तातडीने व प्रभावी कारवाई करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा मुंबई आयकर विभागाने पुनरुच्चार केला आहे.

संबंधित पोस्ट

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे उद्योग सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम : शेख महेमूद

रोजगार हमी योजनेतील जुनी अपूर्ण कामे आठ दिवसात पूर्ण करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

भाजपच्या संकल्प मेळाव्याला व सत्कार सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा… 🎊

vishwatmaklokswamivarta

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta