vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

क्षयरोगाच्या लवकर निदानासाठी आयुष डॉक्टरांचे सीएमई प्रशिक्षण संपन्न..

क्षयरोगाच्या लवकर निदानासाठी आयुष डॉक्टरांचे सीएमई प्रशिक्षण संपन्न..

रायगड- प्रतिनिधी यरोगाच्या निदानास गती मिळावी व संभाव्य रुग्णांची वेळेत ओळख करून उपचारासाठी संदर्भ दिला जावा या उद्देशाने आयुष डॉक्टरांसाठी आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय वैद्यकीय (CME) प्रशिक्षण ग्लोबल फंडच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या SSHAKTI प्रकल्पाअंतर्गत हिंदुस्थान लेटेस्ट फॅमिली प्लॅनिंग प्रोमोशन ट्रस्ट (HLFPPT) यांच्यावतीने, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांच्या सूचनेनुसार हे प्रशिक्षण कार्यक्रम (28 डिसेंबर) रोजी रोटरी क्लब हॉल, पनवेल येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले.

या प्रशिक्षणात एकूण 31 आयुष डॉक्टरांनी सक्रिय सहभाग नोंदविला. प्रशिक्षण सत्रांमध्ये क्षयरोगाची मूलभूत माहिती, लवकर निदानाचे महत्त्व, रुग्ण संदर्भ प्रक्रिया, निक्षय (Ni-kshay) पोर्टलद्वारे क्षयरोग अधिसूचना तसेच NTEP अंतर्गत आयुष डॉक्टरांसाठी उपलब्ध असलेल्या प्रोत्साहन योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी HLFPPTच्या डॉ.सरोज चौधरी यांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, अलिबाग येथील जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे जिल्हा पीपीएम समन्वयक सतीश दंतराव यांनी आयुष डॉक्टरांचे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमातील योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले. त्यांनी निक्षय मित्र या संकल्पनेची माहिती देत, टीबी रुग्णांना सकस व पोषक आहाराची गरज अधोरेखित केली. सर्वांनी निक्षय मित्र बनून टीबी रुग्णांना दत्तक घेऊन फूड बास्केट उपलब्ध करून दिल्यास टीबी मुक्त रायगडच्या उद्दिष्टास गती मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 SSHAKTI प्रकल्पाच्या माध्यमातून सार्वजनिक व खासगी आरोग्य क्षेत्र तसेच आयुष डॉक्टरांशी सातत्याने समन्वय ठेवून “क्षयरोगमुक्त भारत” या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यात प्रभावीपणे कार्य करण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

 

००००

संबंधित पोस्ट

कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणी प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर

vishwatmaklokswamivarta

एमबीबीएस वैद्यकीय  शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सार्वजनिक #आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (#एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

vishwatmaklokswamivarta

क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप-निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात आजपासून स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानतालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

vishwatmaklokswamivarta

हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचा राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून शुभारंभहत्तीरोगग्रस्त नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta