vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

ठाणे जिल्हा कबड्डी अससोसिएशनची कुमार/कुमारी गट निवड चाचणी २६ सप्टेंबर पासून..

ठाणे जिल्हा कबड्डी अससोसिएशनची कुमार/कुमारी गट निवड चाचणी २६ सप्टेंबर पासून…

ठाणे प्रतिनिधी – ठाणे जिल्हा कबड्डी असो. ची कुमार व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २६ सप्टेंबर पासून सुरु होणार. या स्पर्धेतून पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या यजमान पदाखाली वसई विरार महानगरपालिकेच्या सहकार्याने वसई येथे होणाऱ्या कुमार -कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दिनांक ८ ते २१ ऑक्टोबर २०२६ कालावधीत होणाऱ्या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या ठाणे जिल्ह्याच्या कुमार कुमारी संघ निवडण्यात येतील.
 ठाण्यात कुमार गटाचे अधिक संघ असल्याने प्रथम ही स्पर्धा पाच विभागात खेळविण्यात आली. त्यातून ३० संघ या अंतिम स्पर्धेकरिता पात्र ठरले. त्यांची १० गटात विभागणी करण्यात आली. तर कुमारी गटाच्या ३६ संघांची १२ गटात विभागणी करण्यात आली असून सर्व सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळीण्यात येतील.
कुमार गट स्पर्धा शनिवार दि. २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत, तसेच २८ ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत खेळविण्यात येतील. ही स्पर्धा विजय-लव क्लब, काल्हेर यांच्या सहकार्याने घेण्यात येणार आहे. कुमारी गट स्पर्धा दि. २६ ते २९ सप्टेंबर या कालावधीत नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल क्रीडा संकुल, एम. आय. डी. सी. सुदर्शन नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डोंबिविली (पूर्व ) येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेशी संबंधित सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष कृष्णा दादू पाटील यांच्याच्या वतीने करण्यात आले आहे.

 

—

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 11 डिसेंबरला आयोजन प्रवेशासाठी 9 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत…

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडूंनी निवड चाचणीसाठी 9 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर- रोइंग, लॉन टेनिस, मैदानी, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड होणार

vishwatmaklokswamivarta

खरपुडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

कोल्हापुरचा अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता-नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमीच्या सक्षमीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड जिल्ह्याने कायम राखली सर्वसाधारण विजेतेपदाची परंपरा-विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्हा अव्वल