vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

           जालना, प्रतिनिधी) :- जिल्ह्यात हजरत अली जन्मदिवस, संत भगवानबाबा पुण्यतिथी, अंगारक चतुर्थी, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती, मकर संक्राती आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर वर्धापनदिन सोहळा या सण, उत्सव आणि महानगरपालिका मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया, तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.16 जानेवारी 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत.

  संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 16 जानेवारी 2026 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या, स्वच्छतागृह आदींच्या सद्यस्थितीचा अहवाल सात दिवसात द्या – पालकमंत्री पंकजा मुंडे- शाळा दुरुस्तीचा निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश- आदर्श शाळा, आधुनिक ग्रंथालये आणि रेशीम ब्रँडिंगसाठी कालबद्ध आराखडा तयार करा

vishwatmaklokswamivarta

९ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण०३ एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह ०६ सदस्यांचा समावेश*एके-४७ व कार्बाईनसह आत्मसमर्पण; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त*

नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ विशेष तपासणी मोहीम सुरू

पंचायत समिती सभापती पद आरक्षण निश्चितीसाठी दि.१६ रोजी बैठक

पुणे शहरातील तीन ठिकाणांच्याअतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावे- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी