vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना 📢

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना 📢

राज्य प्रतिनिधी-अमरावती जिल्ह्यातील महामार्गाच्या पट्ट्यात ९ ते १३ जानेवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत #वाहतूक तात्पुरती थांबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ अंतर्गत #गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे काम एकूण १० टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या कि.मी. ९०+५०० ते कि.मी. १५०+३०० या दरम्यान ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. या कामाच्या प्रत्येक टप्प्यादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवली जाईल. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर त्या वाहिनीवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या तांत्रिक कामामुळे प्रवाशांचा काही काळ खोळंबा होण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेनुसार करावे आणि महामार्गावरील कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी जिल्ह्यात 22 हजार 375 महिलांची प्रक्रिया प्रलंबित

आदिवासी आश्रमशाळेत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

vishwatmaklokswamivarta

राज्य लॉटरीच्या जानेवारी महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

मराठीवरील प्रभुत्त्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली

राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची मेजवानी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सव’

vishwatmaklokswamivarta