vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंद दि चादर”अंतर्गत नरसी नामदेव येथे आज वारकरी संमेलन;* पूर्वतयारीचा घेतला आढावा

“हिंद दि चादर”अंतर्गत नरसी नामदेव येथे आज वारकरी संमेलन;* पूर्वतयारीचा घेतला आढावा

हिंगोली, प्रतिनिधी: नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या “हिंद दि चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून संत नामदेव महाराज यांच्या पावन भूमीवर नरसी नामदेव येथे उद्या सोमवार, (दि. १९) रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

सदर वारकरी संमेलनाच्या अनुषंगाने आज कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा समाजबांधवांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

या पूर्वतयारी पाहणीवेळी हिंद दि चादर”च्या नांदेड क्षेत्रिय समितीचे अशासकीय सदस्य ॲड. संतोष राठोड, संत नामदेव मंदिर ट्रस्टचे सचिव द्वारकादास सारडा, सुखबीर सिंग अलग, अंबादास दळवी, संदीप राठोड, विकास राठोड, प्रीतम राठोड, सचिन जाधव यांच्यासह अन्य मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.

उद्या होणाऱ्या या वारकरी संमेलनातून संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार होऊन सामाजिक एकात्मता, सद्भावना व आध्यात्मिक जागृतीला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थेबाबत सविस्तर पाहणी करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
***

 

संबंधित पोस्ट

स्वदेशी एक्स्पो’ची तयारी अंतिम टप्प्यात आज उद्घाटनकेंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटनकेंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार-कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे 

सुकन्या समृद्धी खाते काढून मुलीचे भविष्य सुरक्षित करा- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

आदि कर्मयोगी अभियानांतर्गत ब्लॉक मास्टर ट्रेनर प्रशिक्षणाला सुरुवात*

vishwatmaklokswamivarta

जन्माष्टमी निमित्त लोकभवनमध्ये भजनसंध्या

vishwatmaklokswamivarta