vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम चित्ररथास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दाखविली हिरवी झेंडी..

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम चित्ररथास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दाखविली हिरवी झेंडी..

 

परभणी, प्रतिनिधी) – हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि. 24 व 25 जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी परभणी जिल्ह्यात दाखल झालेल्या प्रचार चित्ररथाला जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची, मानवता, सहिष्णुता आणि त्यागाच्या मूल्यांची जाणीव समाजात पोहोचविणे हा या शहीदी समागमाचा मुख्य उद्देश असून, नांदेड येथील कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

*-*-*-*-*

संबंधित पोस्ट

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा-22 वा हप्ता होणार 13 मार्चला वितरित,राज्यातील 91 लाख शेतकरी कुटुबांना 1,837 कोटी रुपयांचा लाभसमारोहचे थेट प्रक्षेपन https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

खारघर येथील हिंद दी चादर कार्यक्रमास देश-विदेशातून संत- महंत आणि भाविकांची उपस्थिती

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

vishwatmaklokswamivarta