vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यास सहकार् करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन सेवेतून निलंबित करणार- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यास सहकार् करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन सेवेतून निलंबित करणार- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल..

        जालना, प्रतिनिधी : जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) दि.10 फेब्रुवारी ते दि.18 मार्च 2026 तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) दि.20 फेब्रुवारी ते दि.18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 37 हजार 338 विद्यार्थ्यांसाठी 79 परीक्षा केंद्र आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 32 हजार 433 विद्यार्थ्यांसाठी 102 परीक्षा केंद्र आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोख व्यवस्था करण्यात आली असून जिल्ह्यातील संवेदनशील बारावीच्या 8 तर दहावीच्या 4 अशा एकुण 12 परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार असून चित्रीकरणही करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यास सहकार्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन सेवेतून निलंबित केले जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिले.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दहावी, बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने दक्षता समितीची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, पोलिस उपअधिक्षक रविंद्र निकाळजे, शिक्षणाधिकारी बाळु खरात यांच्यासह शिक्षण विभागासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, विद्यार्थ्यांची क्षमता विकसित करण्यासाठी कॉपीला आळा घालणे अतिशय महत्वाचे आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी वातावरण निमिर्ती करुन विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ होण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षा अत्यंत महत्वाची आहे. आगामी काळात परीक्षा पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्याचा प्रशासनाचा मानस असून कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित उमेदवारावर कठोर कारवाई करण्यात येईल. परीक्षार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, आपल्या अभ्यासावरुन पेपरमध्ये लिखाण करावे. सर्व परीक्षा केंद्रावर 2 अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठे पथकात नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हाभरात परीक्षेसाठी एकुण 6 भरारी पथके तैनात करण्यात आली असून त्याद्वारे सर्व परीक्षा केंद्रावर लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्र संचालकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

केंद्र संचालकाशिवाय परीक्षा केंद्रावर कोणत्याही व्यक्तीला मोबाईलचा वापर करता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्र परीसरात 144 कलम लागू करण्यात येणार आहे. परीक्षार्थ्यांची तपासणी करुन नंतरच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या एकुण 12 संवेदनशिल परीक्षा केंद्रासाठी वेगळ्या मार्गदर्शक सूचना देण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र व्हॉटसअप ग्रुपही तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या सर्व दहावी, बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या टॉप टेन केंद्र प्रमुखांचा पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव केला जाईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित केंद्र प्रमुखांना माझ्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा गैरप्रकार घडू देणार नाही अशी सामुहिक प्रतिज्ञा देण्यात आली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व केंद्र संचालक आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

 

संबंधित पोस्ट

पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीश भूषण गवई हेच बेंचचे शिल्पकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रोहा येथे पंडित दीन दयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

10 नोव्हेंबरला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

छत्रपतीसंभाजीनगरःपर्यटन’, कॉफीटेबल बुकचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते विमोचन