vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अधिक प्रभावी काम करुन नवी मुंबईचे मानांकन उंचवावे – अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार*

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अधिक प्रभावी काम करुन नवी मुंबईचे मानांकन उंचवावे – अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार*

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-    स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नियमित क्रमवारीपेक्षा उच्चतम अशा ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीत नवी मुंबईचा समावेश असून यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ ला सामोरे जाताना संबधित सर्व घटकांनी आपले संपूर्ण योगदान द्यावे अशा सूचना नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिलेल्या आहेत.

      त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व साफसफाई कंत्राटदारांची बैठक घेउुन त्यांना सर्वेक्षणाच्या टूलकिट मधील बाबींची सविस्तर माहिती दिली व प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर स्वच्छताकर्मींमार्फत काम केले जात असल्याने कंत्राटदारांची जबाबदारी अत्यंत महत्वाची असल्याचे सांगितले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे उपस्थित होते

    यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये स्वच्छतेच्या प्रत्यक्ष दिसण्यावर भर देण्यात येणार असून नागरिकांच्या प्रतिसादालाही प्राधान्याने गुणांकन आहे. त्यादृष्टीने घनकचरा व्यवस्थापनातील सर्व बाबी अधिक गांभिर्याने आणि प्रभावीपणे करण्यावर भर द्यावा असे निर्देश अतिरिक्त आयुक्त यांनी दिले. गावठाणांचा आतील भाग तसेच झोपडपट्टी भागातील अंतर्गत स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष देण्याचे विशेषत्वाने सूचित करीत त्या ठिकाणच्या नागरिकांचेही कचरा वर्गीकरण व विल्हेवाट या अनुषंगाने स्वच्छतेबाबत सातत्याने प्रबोधन करावे असे सूचित करण्यात आले.

   स्वच्छताकर्मीना सुरक्षा साधने दिलेली असूनही अनेकदा ते वापरत नाहीत असे निदर्शनास येते. त्याबाबत स्वच्छताकर्मींना त्यांच्या आरोग्य जपणूकीसाठी सुरक्षा साधनांचा वापर करणे गरजेचे असल्याचे पटवून देत त्यांच्याकडून त्यांचा वापर केला जाईल याबाबत खबरदारी घ्यावी अशाही सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या.

       स्वच्छताकर्मींसाठी कामगार वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याची माहिती सर्व कामगारांपर्यंत पोहचवावी व आवश्यकतेनुसार त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी समन्वयाची भूमिका पुढाकार घेउुन बजावावी तसेच त्यांचे आयुष्मान भारत कार्ड काढण्यात आले नसेल तर त्याबाबतची कार्यवाही तातडीने करुन घ्यावी अशाही सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या. स्वच्छताकर्मींना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे लाभ उपलब्ध करून देण्याविषयी पुढाकार घेण्याचेही सूचित करण्यात आले.

    स्वच्छताकर्मींसाठी ठिकठिकाणी असलेल्या हजेरी शेडमध्ये अधिकच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येत असून त्याबाबत काही सूचना असल्यास त्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे देण्यात याव्यात असे अतिरिक्त आयुक्तांनी सूचित केले.

      ज्या वाणिज्य भागांमध्ये सकाळी व रात्री दोन वेळा सफाई होते, त्या भागांच्या सफाईकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे सूचित करतांनाच स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांनी आपल्या विभागातील कंत्राटदारांच्या नियमित बैठका घेऊन त्यांच्याशी संवादी रहावे आणि सातत्याने समन्वय राखावा असे निर्देश देण्यात आले. यावेळी स्वच्छताविषयक कामे करणा-या कंत्राटदारांना काम करतांना जाणवणा-या अडचणी जाणून घेत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.

     नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विषयक मानांकनात सर्वात महत्वाचे योगदान हे दररोज शहर स्वच्छ ठेवणा-या स्वच्छताकर्मींचे व पर्यायाने त्यांच्याकडून काम करुन घेणा-या आपल्या सर्व कंत्राटदारांची असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ ला सामोरे जातांना आपण सर्वांनी एकसंघपणे आपल्या नवी मुंबई शहराचे मानांकन उंचावण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करुया असे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी केले.

000000

संबंधित पोस्ट

शाळा वाचविण्यासाठी हुतात्मा चौक ते महापालिका कार्यालय पर्यंतचा सामाजिक कार्यकर्ते पालकांचा महामोर्चा 

vishwatmaklokswamivarta

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदार यादी प्रसिद्ध**अद्याप नोंदणी नसलेल्या पात्र मतदारांनी नोंदणी करावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

व्यवसाय परवाना नुतनीकरणाबाबत जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

सातारा व दहिवडी येथील सरदार @ १५० युनिटी मार्च पदयात्रेमध्ये नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हाहाकार! 🌧️ हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत ….

vishwatmaklokswamivarta

29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात “माहिती अधिकार दिन” साजरा होणार

vishwatmaklokswamivarta