vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची १७ फेब्रुवारी रोजी रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक राहणार उपस्थित

भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची १७ फेब्रुवारी रोजी रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक राहणार उपस्थित

लातूर, प्रतिनिधी) : भूकंपासारख्या आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी करावयाच्या उपाययोजनांची रंगीत तालीम मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.

भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीत कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा, काय करावे व काय करू नये, याबाबतची माहिती एनडीआरएफ पथकामार्फत यावेळी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शोध व बचाव पथके यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबींची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.

**

संबंधित पोस्ट

अति.वाळूज औद्योगिक वसाहत भूसंपादन;जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची बैठक

एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· दैनंदिन बैठका, उद्दिष्टनिश्चिती, नव्या वेळापत्रकासह प्रवासी सेवांच्या उन्नतीचा संकल्प..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

30 वर्षापेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी..

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह