vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करताना,वाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावी- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- आपत्कालिन वाहनांना अडथळा निर्माण झाल्यास 10 हजार रूपये दंडाची तरतूद…

आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करताना,वाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावी- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- आपत्कालिन वाहनांना अडथळा निर्माण झाल्यास 10 हजार रूपये दंडाची तरतूद…

सांगली, प्रतिनिधी : मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १९४ (इ) नुसार रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन इत्यादि आपत्कालिन वाहन रस्त्यावरती प्रवास करत असताना इतर वाहनांमार्फत अडथळा निर्माण होत असल्यास अशा वाहनमालक यांच्या विरुध्द 10 हजार रूपये दंडाची तरतूद आहे. तरी वाहनधारकांनी रुग्णवाहिका, अग्निशामक बंब अशा आपत्कालिन वाहनांना मार्गिका उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

मोटार वाहन कायद्यातील या तरतुदीच्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली मार्फत एका वाहनावरती कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे – दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी मोटार वाहन निरीक्षक आकाश कांबळे हे वायुवेग पथकात कामकाज करत असताना दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पुतळ्यासमोरील रस्ता येथे रात्र तपासणी दरम्यान MH ०४ GP ०६२८ हे वाहन आढळून आले. या वाहनधारकाकडे वाहनाची वैध कागदपत्रे नसल्यामुळे वाहनधारकास चलन जारी करण्यात आले. चलन जारी करत असताना वाहन रस्त्याच्या कडेला घेण्याबाबत सूचना मोटार वाहन निरीक्षकांनी देऊनही वाहनचालकाने वाहन रस्त्याच्या मध्ये आडवे उभे केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जॅम झाले. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या रुग्णवाहिकेस अडथळा निर्माण झाला व रुग्णवाहिकेस पर्यायी रस्त्याने जावे लागले. ही बाब अतिशय गंभीर असल्यामुळे मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १९४ (इ) अन्वये (Failure to Allow Free Passage to Emergency Vehicle) वाहन क्रमांक MH ०४ GP ०६२८ या वाहनावरती 10 हजार रुपये दंडात्मक कारवाई बाबत दि. १२ फेब्रुवारी 2026 रोजी आदेश पारीत करण्यात आले असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वतीने शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक तिकीट तपासणीची नवी परिभाषा रचण्याच्या उद्देशाने नमस्ते अभियानाचा प्रारंभ

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी८ महिला व १ पुरुष क्रिकेटपटूची राज्यस्तरीय संधी; प्रशिक्षक ऋषिकेश काने यांच्या मार्गदर्शनाला यश

शिक्षक मतदारसंघाच्या नव्याने मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत;पात्र शिक्षकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शिर्डी येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’चे उद्घाटन सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

परदेशात मराठीचे जतन, संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार- मंत्री उदय सामंत,तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची सांगता; पुढील संमेलन नाशिकला..

vishwatmaklokswamivarta