vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड, प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यात 26 फेब्रुवारीचे सकाळी 6 वाजेपासून ते 12 मार्च 2026 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 26 फेब्रुवारीचे सकाळी 6 वाजेपासून ते 12 मार्च 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

संबंधित पोस्ट

सातारा, खटाव, फलटण येथील मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु*

सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीत 2928 प्रकरणे निकाली*

vishwatmaklokswamivarta

जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

मराठा समाज आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगें पाटील जीआर रद्द करण्याच्या मागणी मुद्द्यावर काय म्हणाले ते पहा

मोफत वीज सवलत व गणेश उत्सव भत्ता योजना लाभासाठी अर्ज मागविले