vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाणा ग्रंथोत्सवाची उत्साहात सांगता; दोन दिवसांत ३ लाखांहून अधिक ग्रंथांची विक्री…

बुलढाणा ग्रंथोत्सवाची उत्साहात सांगता; दोन दिवसांत ३ लाखांहून अधिक ग्रंथांची विक्री…

बुलढाणा, प्रतिनिधी : स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव २०२५’ चा मोठ्या उत्साहात समारोप झाला. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालयाधिकारी कार्यालयामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथदिंडीने सुरू झालेल्या या सोहळ्याला जिल्ह्यातील ग्रंथप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

ग्रंथोउत्सवामध्ये विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना परिसंवाद व कविसंमेलन च्या माध्यमातून मिळाली. पहिल्या सत्रात ‘वाचन संस्कृती: काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवाद पार पडला. प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत नेमिनाथ सातपुते, सुनील वायाळ, डॉ. राजेंद्र गणगे, देविदास समुद्रवार आणि रफिक कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला. संदीप चव्हाण यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

दुपारच्या सत्रात सुभाष किन्होळकर यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कविसंमेलनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. गोविंद गायकी, सर्जेराव चव्हाण, राजेंद्र काळे, रमेश आराख आणि वैशाली तायडे यांसारख्या कवींनी आपल्या बहारदार कविता व गझल सादर केल्या.

ग्रंथप्रेमींचा उदंड प्रतिसाद: या दोन दिवसीय महोत्सवात केवळ चर्चासत्रेच नाही, तर पुस्तक खरेदीलाही मोठा प्रतिसाद मिळाला. बुलढाणेकर ग्रंथप्रेमींनी यावर्षी ३ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ग्रंथांची खरेदी केली, जे वाढत्या वाचन संस्कृतीचे सकारात्मक लक्षण मानले जात आहे. या महोत्सवासाठी जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, कर्मचारी, साहित्यिक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व वाचक उपस्थित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ कल्याण आरटीओ कार्यालयाचा राज्यात दुसरा क्रमांक२५१ वाहनचालकांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

महाराष्ट्र शासनाचे चार, नऊ व पंधरा वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याचे-जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन

महापारेषणच्या वार्षिक दैनंदिनी व प्लॅनर-2025 चे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती-29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार- राज्य लोकसेवा आयोगाची माहिती