vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज (दि.८)खेलो इंडिया ‘अस्मिता’लीगचे उद्घाटन

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज (दि.८)खेलो इंडिया ‘अस्मिता’लीगचे उद्घाटन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India – SAI), राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (NCOE), छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने रविवार दि.८ रोजी माय भारत, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग यांच्या सहकार्याने सायक्लोथॉन आणि वॉकाथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. याच प्रसंगी खेलो इंडिया ASMITA लीगचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा व युवा कार्यक्रम राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात येणार असून महिलांमध्ये क्रीडा सहभाग वाढविणे, फिटनेसला प्रोत्साहन देणे आणि महिला सशक्तीकरणाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 हा कार्यक्रम रविवार दि.८ रोजी सकाळी साडेसहा वाजता विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व सहभागी नागरिकांनी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

कार्यक्रमांतर्गत आयोजित सायक्लोथॉनचा मार्गक्रीडा संकुल → सेवन हिल्स → आकाशवाणी → क्रीडा संकुल असा राहणार आहे

तर वॉकेथॉनचा मार्गक्रीडा संकुल → जवाहर नगर पोलीस स्टेशन → क्रीडा संकुल असा निश्चित करण्यात आला आहे.या कार्यक्रमामध्ये झुंबा सेशन तसेच विविध मनोरंजक फिटनेस उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महिला, विद्यार्थी, फिटनेसप्रेमी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.महिलांचा क्रीडाक्षेत्रातील सहभाग वाढविणे तसेच सक्रिय आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समाजात पोहोचविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे..छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व महिला, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय महिला दिन फिटनेस, सशक्तीकरण आणि सामाजिक एकात्मतेचा उत्सव म्हणून साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..

दर्पणकारांचे पत्रकारितेतील योगदान आणि आजच्या पत्रकारांची नैतिक जबाबदारी

पाणीटंचाई निवारणासाठी मोताळा तालुक्यातील 15 गावांमध्ये 20 विंधण विहिरींना मंजुरी

आटपाडीत घरेलू कामगारांच्या घरी जावून जीवनावश्यक धान्याचे वाटप- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने घराघरात पोहोचले धान्य- प्रशासनाचा माणुसकीचा उपक्रम 

पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

vishwatmaklokswamivarta