vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले टीम इंडियाचे अभिनंदन

न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले टीम इंडियाचे अभिनंदन

मुंबई, प्रतिनिधी  अहमदाबाद येथे झालेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी दारुण पराभव करत तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत या ऐतिहासिक कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन केले आहे.
अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला ९६ धावांच्या मोठ्या फरकाने हरवून भारताने आपले वर्चस्व पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे.
या विजयानंतर आनंद व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतीय संघाने आज दाखवलेली जिद्द आणि सांघिक खेळ वाखाणण्याजोगा आहे. फायनलमध्ये मिळवलेला हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. या यशाने देशात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होत आहे. कर्णधार आणि सर्व खेळाडूंचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
००००

संबंधित पोस्ट

ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनास मदत -आमदार विक्रम काळे• औसा येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे दिमाखात उद्घाटन; ग्रंथप्रेमींचा मोठा प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम;प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी“प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

vishwatmaklokswamivarta

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे राणीउंचेगाव येथे एकदिवसीय शेतकरी मेळावा संपन्न

बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा आदर्श घेऊया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर खरा इतिहास मांडणारे संशोधक म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार – खासदार शाहू छत्रपती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) भेट