vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख: राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख: राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

मुंबई प्रतिनिधी- मनसेप्रमुख राज ठाकरेंनी  रायगडावर जाऊन आपल्या पक्षाचा 20 वा वर्धापन दिन साजरा केला, मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गुढी पाडव्याच्या मेळाव्यात आपण सर्वांना उद्देशून भाषण करू असेही राज ठाकरेंनी म्हटले. विशेष म्हणजे, मनसेच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज मनसेची जोरदार नोंदणीही सुरू आहे. त्यातच, लातूर जिल्ह्यात मनसेला गुडन्यूज मिळाली आहे. मनसेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर पंचायत समितीत मनसेने राजकीय ताकद दाखवून दिली. मनसे-भाजप युतीच्या माध्यमातून पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यात आली असून सभापतीपद मनसेच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे, किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या मनसेन थेट सत्ता स्थापन केली.

मनसेच्या वर्धापन दिनी मनसेनं ग्रामीण भागात, पंचायत समितीच्या सत्तेत सहभागी होत आपले राजकीय वजन सिद्ध केले आहे.

विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पंचायत समितीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. रेणापूर पंचायत समितीच्या एकूण आठ जागांपैकी काँग्रेसने तीन, भाजपाने तीन तर मनसेने दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे, सत्तास्थापनेत मनसेची भूमिका निर्णायक ठरणार हे स्पष्ट झाले होते. त्यातच, पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार, आज झालेल्या पंचायत समिती सभापती निवडी पार पडल्या. त्यामध्ये, मनसेच्या मोनिका सूर्यवंशी यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून भाजपाचे शरद दरेकर यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे.

लातूर ग्रामीणचे भाजप आमदार रमेश कराड यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. रेणापूरमध्ये मनसेच्या विजयाचे शिल्पकार असलेले मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांना भाजपसोबत आणण्यात त्यांना यश आले. त्यानंतर, मनसे आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यामध्ये, भाजपाने सभापतीपद मनसेला देत राजकीय लवचिकता दाखवत पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली. मात्र, या सत्तेच्या सोपानासह पहिल्यांदाच मनसेचा झेंडा पंचायत समितीवर फडकला आहे.

काँग्रेस नेत्यांना राजकीय शह-लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणारे माजी आमदार धीरज देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांना राजकीय शह देण्यात आमदार रमेश कराड यांची रणनीती यशस्वी ठरल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. विशेष म्हणजे लातूरमध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून राज्यातील एकमेव महापालिकेत काँग्रेसने स्वबळावर आपली सत्ता स्थापन केली आहे.

संबंधित पोस्ट

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा स्ट्राइड’ उपक्रमाचा शुभारंभ; ‘मित्र’ राज्याच्या विकासाला दिशा देणारी महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावारूपास येईल

vishwatmaklokswamivarta

पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी (दि.२)

vishwatmaklokswamivarta

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्ग अनुभव’

रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

११ मे रोजी समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा*🟡 *_साधुसतांच्या उपस्थितीत होणार नयनरम्य सोहळा_*

vishwatmaklokswamivarta

घर व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मशालचिन्ह पोहोचवा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांचे आवाहनबदनापूर मतदार संघातील पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न