vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जागेवरच निवड संधी’ या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी;लातूर येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह

‘जागेवरच निवड संधी’ या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी;लातूर येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह

 लातूर, प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय जागेवरच निवड संधी (प्लेसमेंट ड्राईव्ह)चे शुक्रवार, 13 मार्च, 2026 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे

या रोजगार मेळाव्यात नामांकित आस्थापना, उद्योजक सहभागी होणार आहेत. या आस्थापनेमध्ये दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा, तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार, 13 मार्च, 2026 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालया समोर, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखती करीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इ. (तीन प्रती) सह उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, लातूर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ६ महसुली विभागात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अकोला येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम

ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक

मोफत कायदेशीर विषयक मार्गदर्शनासह शासकीय योजनांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहचविणे गरजेचे-न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे• लातूर येथे महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा • शासकीय योजनांविषयी ४० पेक्षा अधिक स्टॉल्सद्वारे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष लाभ वितरित

vishwatmaklokswamivarta

सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी प्रमाणित बियाणे वाटपासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

16 कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित ; जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांची कारवाई नियमाचे उल्लंघन केल्याचे उघड