vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या उपस्थितीत आरंभ,गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही लस सर्व नमुंमपा रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध

नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या उपस्थितीत आरंभ,गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही लस सर्व नमुंमपा रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध

     नवी मुंबई प्रतिनिधी     केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, राष्ट्रीय पातळीवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताचे पंतप्रधान ना.श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ करण्यात आला असून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला आहे.

   नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते आज सीबीडी बेलापूर येथील नागरी आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आरोग्य समितीचे सभापती डॉ.जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम.स्वाती गुरखे, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, वैदयकीय अधिकारी डॉ. अर्चना तायडे उपस्थित होते.

  यावेळी महापौर महोदयांच्या उपस्थितीत कु.अनुष्का सोमनाथ कोळी व कु.अक्षता सचिन कातकरी या विदयाप्रसारक हायस्कुल बेलापूर येथे इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या तसेच कु.अनुजा शंभु माळेकर या नमुंमपा शाळा क्र.4 सीबीडी बेलापूर येथे इयत्ता 8 वीत शिकणाऱ्या विदयार्थीनींना एचपीव्ही लस देण्यात आली. यावेळी त्यांना प्रोत्साहनपर कंपासपेटी भेट म्हणून देण्यात आली.

 याप्रसंगी बोलताना महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी सध्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता व त्यातही स्त्रियांना होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाची मोठी संख्या विचारात घेता सदर लस प्रतिबंधात्मक म्हणून घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. त्यादृष्टीने पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरातील मुलींचे यापासून संरक्षण व्हावे याकरिता ही लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून त्याचा लाभ प्रत्येक मुलीला मिळावा याकरिता पालकांनी जागरुक रहावे व आपल्या मुलीचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापौर महोदयांनी केले. सदर लसीकरण मोहीमेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शाळांच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात यावेत तसेच महानगरपालिकेची रुग्णालये व आरोग्य केंद्रे व वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे येथेही बॅनर्स लावून व्यापक प्रचार करावा असे महापौरांनी सूचित केले.

 या मोहिमेत १४ वर्षे वयोगटातील (ज्या मुलींनी १४ वर्षे पूर्ण केलेली आहेत व १५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत) मुलींना एचपीव्ही लसीकरण करण्यात येईल. मोहीम सुरू झाल्यानंतर पुढील ९० दिवसांच्या कालावधीत १५ वर्षे पूर्ण होणाऱ्या मुली देखील या तीन महिन्यांच्या एचपीव्ही (एचपीव्ही) लसीकरण मोहीमेत लसीकरणास पात्र असतील. नवी मुंबई महानगरपालिकेने आपली 5 रुग्णालये व 26 नागरी आरोग्य केंद्रे या ठिकाणी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एचपीव्ही लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे.

   यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील १४ वर्षे पूर्ण केलेली आहेत व १५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत अशा मुलींच्या एचपीव्ही लसीकरणाचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. नमुंमपाची सर्व रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यासहित IMA, IAP, NIMA, HIMPAM, खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. यांच्यामार्फत एचपीव्ही लसीकरणाबाबतची जनजागृती करण्यात येत आहे.

     तरी नवी मुंबईतील पालकांनी गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी या मोहीमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १५ वर्षे पूर्ण न केलेल्या वयोगटातील प्रत्येक मुलीला एचपीव्ही लस देऊन गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

डास प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता सायंकालीन विशेष धुरीकरण मोहिमेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोग शोध मोहीम प्रभावीपणे राबवा – मिन्नू पी.एम.• 17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर या कालावधीत होणार घरोघरी सर्वेक्षण• समाजात जनजागृती करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यात आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार २३९९ उपचार कॅशलेस; रुग्णालयांवर कडक नियंत्रण

vishwatmaklokswamivarta

जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल – २०२५- चला हिवतापाला संपवु याः पुन्हा योगदान द्या…

लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी अधिक दक्षतेने काम करा,टीबी मुक्त भारत व पल्स पोलिओ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,आरोग्य विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

आरोग्य क्रांतीकडे गडचिरोलीची वाटचाल!  ​’माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग