vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अ.भा. लोकहित महासंघाची स्थापना

अ.भा. लोकहित महासंघाची स्थापना

जालना/प्रतिनीधी – सामाजीक कार्यकर्ते शेख चाँद पी.जे. व वसीम खान यांच्या वतीने सर्वसामान्यांचे हित जोपासण्यासाठी वेळेप्रसंगी त्यांच्या न्याय हक्काकरीता लढा उभारण्यासाठी अखिल भारतीय लोकहित महासंघाची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये अध्यक्षपद शेख चाँद पी.जे. तर कार्याध्यक्ष पद वसीम खान भुषवीणार आहेत. लवकरच जालना शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये महासंघाची बांधणी करून प्रभाग निहाय, शहर व तालुका, जिल्हा कार्यकारीणींची घोषणा करण्यात येईल. या कार्यकारीणीमध्ये सर्व घटकातील, सर्व जातीधर्मातील, महिला, पुरूष, युवक, कामगार, व्यवसायीक, विद्यार्थी यांना सामावुन घेण्यात येईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फु ले, ह. टिपु सुलतान तसेच महाराष्ट्रातील संताच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या संविधानाने नागरिकांना प्रदान केलेल्या मूलभूत हक्क, मानवी हक्क व कायदेशीर अधिकारांचे संरक्षण, संवर्धन व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्य करण्यात येणार असल्याचे महासंघाने जाहिर केले आहे. जालना जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर महासंघासोबत जुडण्याचे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

संबंधित पोस्ट

मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिव राज्यभिषेक दिवसाचे आयोजन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण*

बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यस्तरीय एसआयटी करणार चौकशी आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्न : शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती

राज्यपालांच्या हस्ते १५ युवा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ सन्मानित-नव्या नवेली नंदा, मोना सिंग, जेनेलिया देशमुख सन्मानित

मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा; मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर पूर्ण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रविकासात अभियंत्यांचा सहभाग वाढवा वन नेशन वन अभियांत्रिकी सेवा नियम लागू करावा-इंडेफची मागणी. ३ एप्रिलला नवी दिल्ली येथे बैठक इंजि. के. एम. आय. सय्यद सरचिटणीस, इंडेफ यांनी दिली माहिती.