vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहर महानगरपालिका विषय समित्यांचे भाजपा उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

जालना शहर महानगरपालिका विषय समित्यांचे भाजपा उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

जालना, (प्रतिनिधी) : जालना शहर महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पीठासन अधिकारी श्री.मिसाळ साहेब यांनी दि.११.०३.२०२६ रोजी जाहीर केला त्यानुसार दि.१२.०३.२०२६ रोजी फॉर्म विक्री करण्यात आली व आज दि.१३.०३.२०२६ रोजी सर्व विषय समित्यांचे सभापती व उपसभापती पदाचे नामनिर्देशन आज दुपारी ३.०० वाजेपर्यंत दाखल करणे, भारतीय जनता पार्टी च्या वतीने महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर यांचा तसेच महिला व बालकल्याण सभापती पदाकरिता सौ.संध्या संजय देठे, उपसभापती पदाकरिता सौ.पद्मा अजित मानधनी, स्वच्छता व आरोग्य समिती समितीवर सभापती पदासाठी श्री. कपिल श्रावण भूरेवाल व उपसभापती पदासाठी सौ.अनामिका विजय पांगारकर, बांधकाम समिती सभापती पदाकरिता सौ.माया मनोज जोशी व उपसभापती पदाकरिता सौ.ऐश्वर्या अशोक आडेकर शिक्षण व विद्युत सभापती पदासाठी सौ. भाग्यश्री सुजितकुमार जोगस व उपसभापती पदासाठी सौ. कार्तिकी मनोज इंगळे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती पदाकरिता सौ. पूनम राजेश स्वामी व उपसभापती पदासाठी सौ. अनिता मोहन खोडवे यांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले. दि.१७.०३.२०२६ रोजी सदरील नामनिर्देशन पात्रांची छाननी होऊन विजय झालेल्या सर्व उमेदवारांची घोषणा होणार आहे.

सदरील नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळी महापौर श्रीमती वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, भाजपा सभागृह गटनेते महेश निकम, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, देविदास देशमुख, राजेश जोशी, सुजित जोगस, शिवराज जाधव, शिवाजी वेताळ, रणजीत मगरे, राजेश बाबरेकर, विजय पांगारकर, धिरज मेवाडे, बापू साळवे, अशोक आडेकर, मनोज इंगळे, लक्ष्मण गोर्डे, प्रतिक पांगारकर, मनोज जोशी, अमित मानधनी, रवि सले, नारायण पवार इत्यादीसह सर्व उमेदवार व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाबासाहेब पाटील

 

संबंधित पोस्ट

फळरोपवाटिकामधील कामासाठी निविदा प्रसिध्द

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश**धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव व नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध*

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा येथेशिकाऊ उमेदवारांची भरतीØ पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणपूरक गणेशमुर्तीचा जागतिक विक्रम; 5,348जणांनी साकारल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती.

vishwatmaklokswamivarta

५ वर्षांच्या विश्रांतीनंतर कैलास मानसरोवर यात्रेला २० जूनपासून सुरुवात होणार; पहिला ताफा यात्रेकरूंचा उद्या गंगटोकला पोहोचणार

vishwatmaklokswamivarta