vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; दोन लाखांपर्यत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क पुर्णपणे माफ 

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; दोन लाखांपर्यत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क पुर्णपणे माफ

नांदेड, प्रतिनिधी :-महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून, दोन लाखांपर्यत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पुर्णपणे माफ केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बँका, वित्तीय संस्थानी त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधिक्षक, पुणे यांनी दिले आहे.

                                                                                                                                                                            सर्व बँका, वित्तीय संस्थाना शासन अधिसूचनेत नमुद केल्यानुसार शेती किंवा पीक कर्जाशी संबंधीत संस्थानी अभिस्वीकृती, रोखपत्र करारनामा, हक्कविलेख निक्षेप, हडप तारण किंवा तारण गहाण, हमीपत्र गहाणखत, प्रतिभुती बंधपत्र, गहाणखत, गहाणाचे सुचनापत्र किंवा घोषणापत्र किंवा यास संलग्न अशा कोणत्याही संलेखावर आकारणी योग्य असलेले दोन लाखांपर्यतचे मुद्रांक शुल्क पूर्णत: माफ करण्यात आले आहे. याबाबत काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश शासन अधिसूचनेद्वारे दिले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन; तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची खास योजना..

मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या व अभिनेत्री विजया मेहता यांच्या निधन

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे रोजगार निर्मिती ला प्राधान्य ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

भारतीय टपाल विभागाच्यावतीने ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सन्मान