vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील काही भागात सध्या अंशतः ढगाळ हवामान- कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागात वादळी पावसाची शक्यता.. हवामान खात्याचा अंदाज

राज्यातील काही भागात सध्या अंशतः ढगाळ हवामान- कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागात वादळी पावसाची शक्यता.. हवामान खात्याचा अंदाज

राज्य प्रतिनिधी

राज्यातील काही भागात सध्या अंशतः ढगाळ हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे.

दि. ३० व ३१ मार्च २०२६ दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक हतबल,भास्कर आबा दानवे यांनी तातडीने मदतीसाठी मागणी केली

vishwatmaklokswamivarta

महाकुंभमेळ्यात काश्मीर आणि बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांसंबंधी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन!बांगलादेश व काश्मिरी हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक! – स्वामी कंजलोचन कृष्णदास, इस्कॉन, श्रीचंद्रोदय मंदिर, वृंदावन

vishwatmaklokswamivarta

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पीक विम्याची नुकसान भरपाई अदा – पीक विमा जिल्हा व्यवस्थापक 

vishwatmaklokswamivarta

विकसित नागपूर-२०४७’ आराखड्याची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी होईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मित्रा’ संस्थेच्या वतीने नागपूर विभाग शाश्वत विकासाच्या रणनीतीवर आधारित कार्यशाळेचा समारोप

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू