vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाटण शहरातील रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

पाटण शहरातील रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

सातारा  प्रतिनिधी कराड- चिपळूण महामार्गावरील पाटण शहरांतर्गत रस्त्याचे काम खूप दिवसांपासून रखडलेले आहे. तसेच हा रस्ता खूप खराब झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तरी रस्ते विकास महामंडाळने पाटण शहरातील अंतर्गत रस्ता व जुना धांडे पूल पाडून नवा पुलसह रस्ते काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाटण शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कामामुळे वाहन धारकांना पर्यायी रस्ते दिले आहेत. हे रस्ते गावागावातून जात असल्याने या रस्त्यांवरुन अवजड वाहने जाणार नाहीत याची पोलीस विभागाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई जड वाहने ही आंबा घाट मार्गे सोडावीत. पाटण एसटी डेपो परिसरातील अतिक्रमणाबाबत न्यायालयाचा लवकर निकाल येईल, येणाऱ्या निकालाप्रमाणे राज्य परिवहन विभागाने कारवाई करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

पाटण तालुक्यातील अभयचीवाडीसह काही गावांत शेतकऱ्यांचे पिकांचे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. यामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत. यावर उपाय म्हणून शेतीभवती सौर कुंपण अथवा चर यापैकी जो पर्याय प्रभावी आहे तो करावा. यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत दिली.

नाव गावातील ग्रामस्थ पिढ्यानं पिढ्या वन विभागाची जमीन कसत असून त्यांची उपजिविका त्यावर अवलंबून आहे. ही जमीन वन विभागाने ताब्यात घेतली आहे. कसणाऱ्या शेतकऱ्यांना ही जमिन मिळावी यासाठीचा प्रस्ताव आयुक्तांमार्फत शासनाला सादर करा. याबाबत महसूल व वन यांची मंत्रालयात संयुक्त बैठक घेण्यात येईल व सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

कडेपूरमधील राखीव वनक्षेत्रात 28 हजारांचे खैर लाकूड जप्त

बांधकाम कामगारांना नियुक्त संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण- सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर

पंचायत समिती सभापती पद आरक्षण निश्चितीसाठी दि.१६ रोजी बैठक

हिंदू विधीज्ञ परिषदेचे प्रसिद्धीपत्रक*पुणे येथे ‘श्री रामनवमी उत्सव समिती’च्या वतीने पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न! हिंदु शौर्य पुरस्कार-२०२६’ने हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर सन्मानित!*

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी अभियान उपयुक्त – आदिती तटकरे यांचे आवाहन,मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त 28 शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

श्रीराम नवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात वाहतूक नियमन..

vishwatmaklokswamivarta