vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यात ‘डिजिटल शेतीशाळा’1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यात ‘डिजिटल शेतीशाळा’1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन

 

अमरावती, प्रतिनिधी: मागील काही वर्षांत हवामानातील बदलामुळे निर्माण झालेली पावसाची अनिश्चितता, पावसातील खंड, मान्सूनचे उशिरा आगमन आणि गारपीट यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतीला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू केलेल्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0’ (PoCRA) अंतर्गत, अमरावती जिल्ह्यासह राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने येत्या एप्रिल 2026 मध्ये विशेष ‘डिजिटल शेतीशाळा’ आयोजित करण्यात आल्या आहेत.

पाणी फाउंडेशनद्वारे संचालित ही डिजिटल शेतीशाळा झूम आणि यूट्यूब यांसारख्या ऑनलाईन माध्यमांतून चालविली जाणार आहे, जिथे तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना पीकनिहाय शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळेल. या नियोजित शेतीशाळांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, सर्व सत्रे सायंकाळी 7:30 वाजता सुरू होतील. यामध्ये प्रामुख्याने 1 एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे आणि बीज प्रक्रिया यावर चर्चा होईल. त्यानंतर 8 एप्रिल रोजी बीजामृत, जीवामृत व दशपर्णी अर्क यांसारख्या जैविक निविष्ठा उत्पादनाचे धडे दिले जातील, तर 15 एप्रिल रोजी एकात्मिक कीड व्यवस्थापन, सापळा पिके आणि मित्रकिडींचा वापर या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या प्रगत तंत्रज्ञान शिकता येणार असून, खते आणि कीडनाशकांचा खर्च कमी करून उत्पादकता वाढवणे शक्य होणार आहे. हवामानानुसार पेरणीचे अचूक नियोजन आणि तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे प्रकल्प संचालकांनी नमूद केले आहे. तरी, जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांनी या डिजिटल शेतीशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आत्मा’ प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

0000000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गतजिल्हा उद्योग केंद्राने गाठले कर्ज मंजुरीच्या 325 प्रस्तावाचे उद्दिष्ट..

vishwatmaklokswamivarta

पश्चिम आशियातील युद्धामुळे #एलपीजीगॅस च्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर-महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

राज्यातील जनतेला रमजान ईदच्याशुभेच्छा,मानवकल्याण, विश्वबंधुत्वासह सामाजिक ऐक्याचा संदेश जगाला देऊया – उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा; मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर विमानतळावर रुग्णाची विचारपूस

अवैध दारू प्रतिबंध जिल्हास्तरीय समिती अशासकीय सदस्यांची नियुक्ती, अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta