vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

अमृतच्या लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षण सुरू

अमृतच्या लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षण सुरू

 सांगली, प्रतिनिधी : अमृत परिवार सर्वेक्षण अभियान दि. 1 ते 25 एप्रिल 2026 दरम्यान सांगली जिल्ह्यात राबवले जाणार आहे. या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्षित गटाशी संपर्क करणार आहेत. लक्षित गटातील विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळे यांच्याकडून सुद्धा समाजाची माहिती घेतली जाणार आहे. संबंधित जातीत असणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळे या कालावधीत अमृतच्या प्रतिनिधींशी संपर्क करून आपल्या परिवाराची, समाजाची माहिती देवून विविध योजनांची माहिती घेऊ शकतात. लक्षित गटातील जास्तीत जास्त व्यक्तींनी अमृत कडे आपल्या परिवाराची नोंदणी करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेन्द्र जहागिरदार यांनी केले आहे.

 महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अशा जाती ज्यांना इतर कुठल्याही संस्था किंवा महामंडळे यांचा लाभ नाही, त्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल (कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेल्या) घटकांसाठी काम करते. अमृतच्या लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य या जातींचा समावेश आहे. अमृतच्या विविध योजना कुटुंबातील प्रत्येक घटक जसे विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक, शेतकरी यांच्यासाठी आहेत. या योजना लक्षित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचाव्या यासाठी अमृतकडून संपूर्ण महाराष्ट्रात या लक्षित गटातील कुटुंबांचे परिवार सर्वेक्षण केले जाणार आहे

 अधिक माहिती साठी संपर्क – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत). सांगली जिल्हा कार्यालय, अप्पर तहसील कार्यालया समोर, राजवाडा, सांगली 416416, जिल्हा कार्यालय – 9112228766, जिल्हा व्यवस्थापकः शैलेंद्र जहागीरदार 7972830757 (तालुकाः- मिरज, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव, खानापूर, आटपाडी), अमृत मित्रः- अभिजित कुलकर्णी 8275378019 (तालुकाः- वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव), संकेतस्थळ:- https://mahaamrut.org.in/

00000

संबंधित पोस्ट

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत निर्णय लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

vishwatmaklokswamivarta

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान.

अलिबाग येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय

गतीमान आणि पारदर्शी कारभारासाठी-महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस