vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेख मुकरम यांच्या हस्ते बालाजी सोनटक्के यांचा सत्कार

शेख मुकरम यांच्या हस्ते बालाजी सोनटक्के यांचा सत्कार

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : वाळूज गटातून निवडून आलेले तसेच निवृत्त पोलीस उपायुक्त श्री. बालाजी सोनटक्के यांची जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीपदी निवड झाल्यानंतर विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सहसचिव (पदवीधर विभाग) शेख मुकरम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

शेख मुकरम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष इम्रान शेख, कय्युम भाई, अल्फात भाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी सोनटक्के यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.”बालाजी सोनटक्के यांनी आपली भावना व्यक्त केली”माझ्यावर सोपवण्यात आलेली जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीपदाची जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे पार पाडेन. समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यावर माझा भर राहील. सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे,” असे त्यांनी सांगितले

शेख मुकरम काय म्हणाले “श्री. बालाजी सोनटक्के यांची समाज कल्याण सभापतीपदी झालेली निवड अत्यंत योग्य आहे. त्यांनी पोलीस सेवेत प्रामाणिकपणे काम करत समाजात विश्वास निर्माण केला आहे. त्याच अनुभवाचा उपयोग करून ते समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभावी काम करतील, असा मला विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याण विभाग अधिक सक्षम व गतिमान होईल,” असे मत शेख मुकरम यांनी व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यात १८ मे अखेर ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा६४ गावे व २३० वाड्यांतील १ लाख १३ हजार ७०९ नागरिकांना दिलासा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन,नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही…

vishwatmaklokswamivarta

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये नोव्हेंबर महिन्यात 1.40 लाख दंडात्मक वसूली व 46.5 किलो प्लास्टिक जप्त

vishwatmaklokswamivarta

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरआज विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाभरातील भुमिहिन, बेघर, कास्तकर सहभागी होणार..

पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक कार्यालयीन समित्यांनी अधिक सक्रिय व्हावेराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर

प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न अन्नकूट प्रसाद ही केवळ परंपरा नाही, ती भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे ही परंपरा पुढील पिढ्यांनी जपली जावी – जिल्हाध्यक्ष, भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta