vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रस्ते सुरक्षा जनजागृती ही एक राष्ट्रीय चळवळ असून, रस्ते वापरणाऱ्या सगळ्यांनीच जबाबादारीने वागण्याची अपेक्षा: रस्ते वाहतूक राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा

रस्ते सुरक्षा जनजागृती ही एक राष्ट्रीय चळवळ असून, रस्ते वापरणाऱ्या सगळ्यांनीच जबाबादारीने वागण्याची अपेक्षा: रस्ते वाहतूक राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा

नवी दिल्ली प्रतिनिधी-रस्ते सुरक्षाविषयक जनजागृती उपक्रम, केवळ समारंभ नाहीत, तर एका व्यापक राष्ट्रीय मोहिमेचा अविभाज्य घटक असून, त्याचा उद्देश, देशभरात, रस्त्यांचा वापर अधिकाधिक जबाबदारीने करण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करणे हा आहे, असे प्रतिपादन, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि कार्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी केले.

रस्ते सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि जबाबदार चालकत्व विषयीची मानसिकता तयार करण्यासाठी त्यांचा, विभाग कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

तिसऱ्या उत्तराखंड साहसी राईडला त्यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केले, त्यावेळी ते बोलत होते. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ने ही सफर आयोजित केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने, रस्ते वाहतुकीत मोठी प्रगती केली आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र रस्ते सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून नागरिकांच्या वर्तणूकीवर ते अवलंबून आहे, असे ते म्हणाले. दरवर्षी, 1.8 लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, असेही त्यांनी नमूद केले.या संदर्भात सरकारच्या सक्रिय आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाविषयी संगत, त्यांनी 4-E धोरणाची माहिती दिली. अभियांत्रिकी, अंमलबजावणी, शिक्षण आणि आपत्कालीन काळजी या चार स्तंभावर, रस्ते सुरक्षेचा आराखडा आधारलेला आहे, असे ते म्हणाले.

युवकांच्या प्रतिसादावर भर देत, मल्होत्रा यांनी, संवादात्मक सत्रे आणि जनजागृती कार्यक्रमातून, त्यांची जाणीवजागृती केली जाते, असे सांगितले.रस्ते वापरणाऱ्या सर्वांनी,वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित पोस्ट

विशेष लेख….पनवेल महानगरपालिका राज्यात अव्वल : प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी*

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आरपीआय हीच आमची माय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**देशभरातील दलितांच्या राजकीय चळवळीचे आरपीआय हेच मातृस्थान* 

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच यशस्वी ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ (गुडघा प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया संपन्न 

1 जून  ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग वरंध घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला

यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अमृतची विशेष अर्थसहाय्य योजना; पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले