vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

टीसीएस’मध्ये दीडशे पदे भरणार; जिल्ह्यातील युवकांना संधी अकोल्यात १५ एप्रिलला पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

‘टीसीएस’मध्ये दीडशे पदे भरणार; जिल्ह्यातील युवकांना संधी अकोल्यात १५ एप्रिलला पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

अकोला, प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्रीमती मेहेरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १५ एप्रिल रोजी ‘पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ श्रीमती मेहेरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे सकाळी १० वा. आयोजित करण्यात आला आहे.

नामांकित ’टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीद्वारे पदवीधर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. बीबीए, बी. कॉम., बी.ए., बी.एस्सी (जनरल), बीसीए, बीसीसीए आदी पदवीधर किंवा एम ए., एम. कॉम अशी पदव्युत्तर ही शैक्षणिक अर्हता असलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तथापि, केवळ २०२४ २०२५ आणि २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच या भरतीसाठी पात्र असतील.

या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/gp5PSviLBPh1Rotk6 या लिंकवर जाऊन आपला अर्ज भरावा.

निवड प्रक्रियेसाठी टीसीएस कंपनीतर्फे लेखी परीक्षा आणि त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल.

मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आपला अद्ययावत बायोडेटा, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकारातील छायाचित्र आणि आवश्यक ओळखपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या ०७२४-२४३३८४९ किंवा ९४२१४२५०६६/7024241098या क्रमांकावर संपर्क साधता येईल. अकोल्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

vishwatmaklokswamivarta

अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नोंदणी सुरु:वेळापत्रकानुसार नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्हा महिला व बाल विकास विभागाने रोखले 131 बालविवाह बालविवाहाच्या 2 प्रकरणात गुन्हे दाखल…

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ अखेर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन

पाणी परवाना, विद्युत उपसा यंत्र परवाने-31 जानेवारीपर्यंत नूतनीकरण करून घ्यावेत..

vishwatmaklokswamivarta