vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्र – निवड चाचण्यांसाठी१९ एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्र – निवड चाचण्यांसाठी१९ एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक खेळाडूंनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने missionlakshyavedhmumcity@gmail.com या इमेल वर सादर करावा. ⁠https://forms.gle/ix76WxCTeTtZFH6R8 ही अर्जाची लिंक असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ एप्रिल, २०२६ आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी कळविले आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू घडविणे हा आहे.

या उपक्रमांतर्गत मुंबई शहराकरिता पाच क्रीडा प्रकारांची क्रीडा प्रतिभा विकास केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. बॅडमिंटन, बॉक्सिंग, शूटींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांसाठी जिल्हास्तरावर निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. निवड प्रक्रियेदरम्यान तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत खेळाडूंचे कौशल्य परीक्षण करण्यात येणार असून निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या निवड चाचण्यांसाठी २१ वर्षांखालील खेळाडू पात्र असून जिल्हा स्तरावर पदकप्राप्त, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला असणे अनिवार्य आहेअनिवार्यl

अर्जासोबत जन्मदाखला, पासपोर्ट साईज ३ फोटो, शाळा सोडल्याचे,स्थलांतरण प्रमाणपत्र (कॉलेजमधील खेळाडूंसाठी), आधार कार्ड, मेडिकल सर्टिफिकेट, क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट व पालक संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. निवड चाचणीच्या दिवशी सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.

निवड चाचणी संदर्भात अधिक माहितीसाठी निलेश गराटे – 9702212925, साहिल उतेकर – 9702171004, समृद्धी देवळेकर – 8779727571 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

0000

संबंधित पोस्ट

भारताचा ऐतिहासिक विजय!-🙌🇮🇳इंग्लंडच्या घरच्या मैदानावर ५८ वर्षांनी ३३६ धावांनी पराभव करून इतिहास रचला

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी २४ जूनपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

क्रीडा पुरस्कार 2023-24 साठी-26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्जमागणी..

vishwatmaklokswamivarta

बहारीन येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची शौर्या अंबुरे हिने उल्लेखनीय कामगिरी…

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेक्रीडा गणवेश दर्जा, क्रीडा मार्गदर्शक मानधन,प्रशिक्षणार्थी भोजन दरात वाढ करण्याचा निर्णय

vishwatmaklokswamivarta