vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

नांदेड, प्रतिनिधी :- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगली असून सर्व विभागांना आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्ह्यात वेळोवेळी जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांदरम्यानही महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे अनेक संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

19 एप्रिल 2026 रोजी अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जातो. या काळात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणताही बालविवाह घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने दक्ष राहावे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.

बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

भेसळयुक्त खाद्यतेलाचा ४२ हजार २९४ किलो साठा जप्त;अन्न व औषध प्रशासन विभागाची ऑगस्टपासूनची कारवाई

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती.

सातारा येथे उभारण्यात येणारे ‘माजी सैनिक एकात्मिक संकुल’ हे राज्यात आदर्श ठरावे – पालकमंत्री शंभुराज देसाई

अन्न व औषध प्रशासनाकडून मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची तपासणी

जल साक्षरता वाढीसाठी प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करावे,जलसाक्षरता समन्वय समितीच्या बैठकीतील सूचना

vishwatmaklokswamivarta

एव्हीजीसी – एक्स आर’ धोरणात मराठी चित्रपट निर्मितीचा समावेश करावा- उद्योग मंत्री उदय सामंत