vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई; अक्षय तृतीयापासून जिल्ह्यात 11 बालविवाह रोखले..

महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई; अक्षय तृतीयापासून जिल्ह्यात 11 बालविवाह रोखले..

नांदेड, प्रतिनिधी :- महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापासून नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी होऊ घातलेले एकूण 11 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

चाईल्ड लाईन 1098 ही राष्ट्रीय आपत्कालीन सेवा 24 तास कार्यरत असून, बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यात येते. 19 एप्रिलपासून अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी बालविवाह होत असल्याच्या तक्रारी 1098 या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाल्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून थेट घटनास्थळी जाऊन कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईदरम्यान संबंधित वधू-वरांचे वय तपासून बालविवाह थांबविण्यात आले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळले. देगलूर तालुक्यातील 1, नायगाव तालुक्यातील 2, लोहा तालुक्यातील 3, नांदेड तालुक्यातील 3, भोकर तालुक्यातील 1 व मुखेड तालुक्यातील 1 असे एकूण 11 बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार विवाहासाठी मुलाचे किमान वय 21 वर्षे व मुलीचे 18 वर्षे असणे आवश्यक आहे. या संदर्भात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर ग्रामपंचायत अधिकारी व अंगणवाडी सेविका यांची भूमिका बालविवाह प्रतिबंधासाठी महत्त्वाची ठरत आहे.

जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

१२ एप्रिल रोजी ठाण्यात पहिल्यांदाच ‘कोकणची लोकधारा’डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

मुंबईतील कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंड प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीसाठी समिती गठीत करणार- मंत्री उदय सामंतउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार

सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठीअन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

विकसित भारतासाठी महिला व बालकांचा सर्वांगीण विकास राज्यांच्या समन्वयाने शक्य- केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी कुपोषण निर्मूलन व महिलांच्या सुरक्षेसाठी अंगणवाडी व योजनांच्या बळकटीकरणाची महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी..

भारतीय जनता पार्टी मंडळाच्या नियुक्त्यांची आज घोषणा*

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेकेसरेकर दाम्पत्याच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व- मुलांची भेट घेऊन केले सांत्वन