vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

मुंबई प्रतिनिधी-सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात झाला. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, केंद्र सरकारच्या क्षमता बांधणी आयोगाच्या अध्यक्ष राधा चौहान, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा उपस्थित होते. कार्यक्रमास विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश हा सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करणे आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’ असून त्याच्या सेवेसाठीच टेक वारी आहे. केवळ तंत्रज्ञान नव्हे तर मानवी संवेदना, मानसिक आरोग्य, आत्मपरीक्षण ‘आर्ट ऑफ हँडलिंग क्रिटिसिझम’ विषयही प्रशासनासाठी महत्त्वाचा आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ‘टेक वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक-केंद्रित प्रशासनाचा वेगवान रोडमॅप राबविला जात असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासन अधिक कार्यक्षम आणि सुलभ करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

‘टेक वारी’ ही संकल्पना वारीच्या सातत्यपूर्ण परंपरेप्रमाणेच प्रेरणादायी आहे. जसे वारकरी कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरची वारी चुकवत नाहीत, तसेच आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने शिकणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञान दररोज बदलत असून, ते आपण जर स्वीकारले नाही तर व्यक्ती काळाच्या ओघात मागे पडू शकतात, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

‘टेक वारी’ उपक्रमात ‘लेफ्ट ब्रेन’ आणि ‘राईट ब्रेन’ या दोन्हींच्या विकासावर भर देण्यात आला आहे. तंत्रज्ञान, एआय, भाषा आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारख्या विषयांद्वारे विश्लेषणात्मक क्षमतेचा विकास केला जात असून, संगीत, योग, नृत्य आणि संस्कृतीसारख्या उपक्रमांमधून सर्जनशीलता आणि मानसिक स्वास्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

एआय एजंट वासुदेव हा नाविन्यपूर्ण प्रयोग या कार्यक्रमात वापरण्यात आला. एआय एजंटने प्रेक्षकांशी संवाद साधला व त्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती प्रेक्षकांना दिली. तसेच टेक वारीच्या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले.

संबंधित पोस्ट

पिंपरी-चिंचवड इथं विषारी दारु प्यायल्यामुळे १३ जणांचा मृत्यू अनेकजण गंभीर. रुग्णालयात उपचार सुरू

५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चार आरोपींना अटक..

vishwatmaklokswamivarta

उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस भूस्खलन- पर्यटक अडकले, बचाव कार्य सुरू

महाराष्ट्र राज्य जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर..

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद ठाणे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना  बुधवार २० रोजी सुट्टी, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापानाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक/माध्यमिक/खासगी अनुदानित/विना अनुदानित शाळांना आज बुधवार २० रोजी सुट्टी जाहीर

प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीन.. तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील- मंत्री संजय राठोड