vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लेख : सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !- संस्था-सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !

लेख : सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !- संस्था-सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !

विशेष प्रतिनिधी-

प्रस्तावना      ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्यासारख्या थोर विभूतीच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले सनातनचे ग्रंथ म्हणजे चैतन्यमय असे ज्ञानभांडार ! अनेक संत धर्म, अध्यात्म यांसंबंधी ग्रंथ लिहितात; पण धर्म, अध्यात्म यांच्यासह राष्ट्ररक्षण, हिंदु राष्ट्राची स्थापना, भाषाशुद्धी, सात्त्विक कला अशा विविधांगी विषयांवर ग्रंथ लिहिणारे सध्याच्या कलियुगातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे बहुधा एकमेवच संत असतील ! त्यांच्या अविश्रांत तळमळीमुळे एप्रिल २०२६ पर्यंत सनातनच्या ३७० ग्रंथ-लघुग्रंथांच्या १३ भाषांत १ कोटी २ लाख ६७ हजार प्रती प्रकाशित झाल्या आहेत !

     सनातनच्या ग्रंथांनी १ कोटीचा टप्पा पार करणे, ही सनातनच्या ग्रंथकार्यासाठी भूषणावह घटना आहे ! प्रकाशित प्रतींच्या या संख्येवरून ‘समाजातील जिज्ञासूंना अध्यात्माची आणि शास्त्र समजून घेण्याची आवड किती आहे’, हे लक्षात येते.

गुरुदेवांचा वैद्यकीय लिखाणापासून आध्यात्मिक ग्रंथांपर्यंतचा प्रवास !      गुरुदेवांनी आपल्या ग्रंथलिखाणाचा श्रीगणेशा वैद्यकीय क्षेत्रापासून केला. त्यांचे बंधू डॉ. वसंत आठवले यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांनी ‘सायन्स ऑफ हिप्नोसिस’ आणि ‘हिप्नोथेरपी’ यांसारखे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. मात्र, काही काळानंतर त्यांच्या लक्षात आले की, भौतिक व्याधींवर उपचार करण्यापेक्षा ‘अध्यात्मशास्त्र’ श्रेष्ठ आहे. यातूनच १९८७ मध्ये त्यांनी ‘अध्यात्मशास्त्र’ हा पहिला ग्रंथ लिहिला. कालांतराने साधनेविषयी केवळ तात्त्विक माहिती न देता, ‘साधना कशी करावी’, या कृतीच्या स्तरावरील मार्गदर्शनावर त्यांनी भर दिला.’तू किताबों के उपर किताबे लिखेगा’ हा गुरुआशीर्वाद !      गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी दिलेला ‘तू किताबों के उपर किताबे लिखेगा’ हा आशीर्वाद शिरसावंद्य मानून त्यांनी ग्रंथलेखन केले. हे ग्रंथ लोखंडाचे सोने करणार्‍या परिसाप्रमाणे आहेत; कारण या ग्रंथांतील शिकवण आचरणात आणल्याने अनेकांच्या जीवनात आमूलाग्र पालट झाले आहेत

अध्यात्मशास्त्राच्या इतिहासातील दुर्मिळ उदाहरण !       इतर संतांप्रमाणे केवळ प्रवचने किंवा कीर्तने न करता गुरुदेवांनी ग्रंथलेखनाद्वारे समाजाला ‘साधने’चा मार्ग दिला. याची प्रचिती म्हणजे १.५.२०२६ पर्यंत सनातन संस्थेचे १३४ साधक संत झाले आहेत, तर १०२५ साधकांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ग्रंथांचा अभ्यास करून इतक्या वेगाने संतनिर्मिती होणे, हे अध्यात्मशास्त्राच्या इतिहासातील दुर्मिळ उदाहरण आहे.

सनातनच्या ग्रंथसंपदेची अद्वितीय वैशिष्ट्ये ! १. केवळ अध्यात्मच नव्हे, तर आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, सात्त्विक कला, आपत्कालीन उपचार आणि वाईट शक्तींपासून संरक्षण अशा विविध विषयांवर ही ग्रंथसंपदा उपलब्ध आहे.

२. क्लिष्ट शब्दांचा वापर न करता सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत हे ज्ञान मांडले आहे.

३. विशेष म्हणजे, व्याकरणाच्या दृष्टीने हे ग्रंथ अत्यंत शुद्ध आहेत. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे की, व्याकरणदृष्ट्या शुद्ध लिखाणात सकारात्मक ऊर्जा अधिक असते.

४. ग्रंथांमध्ये आजच्या विज्ञानवादी पिढीला पटेल अशा प्रकारे सारणी, टक्केवारी आणि वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे अध्यात्मशास्त्र मांडले आहे.

५. ग्रंथांतील २० टक्के ज्ञान हे पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नाही. हे ज्ञान बुद्धीने न लिहिता ईश्वरी प्रेरणेने स्फुरलेले आहे.

सनातन-निर्मित ग्रंथसंपदेचा भाषानिहाय विस्तार !

     हे दिव्य ज्ञान केवळ एका भाषेपुरते मर्यादित न राहता विविध प्रांतांतील जिज्ञासूंपर्यंत पोचावे, यासाठी सनातनने अहोरात्र प्रयत्न केले आहेत. मार्च २०२६ पर्यंत सनातनने १३ भाषांमध्ये आपले ज्ञानभांडार खुले केले आहे. यामध्ये सर्वाधिक ३४८ ग्रंथ मराठी भाषेत असून, त्यापाठोपाठ इंग्रजी भाषेत २०२, तर कन्नड आणि हिंदी भाषांत प्रत्येकी २०१ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यासोबतच गुजराती भाषेत ७०, तेलुगुमध्ये ५४, तमिळमध्ये ४९, बंगालीमध्ये ३०, मल्ल्याळम्‌मध्ये २५, ओडियामध्ये २२, पंजाबीमध्ये १३, नेपाळीमध्ये ३ आणि आसामी भाषेत २ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अशा प्रकारे एकूण ३७० ग्रंथांच्या माध्यमातून अध्यात्माचा हा चैतन्यमय प्रवाह भारतभर प्रवाहित होत आहे.ग्रंथांचे मुख्य विषय !

हिंदु धर्म : सण, उत्सव, १६ संस्कार आणि परंपरा. आचारधर्म : आदर्श आहार, निद्रा, वेशभूषा आणि अलंकार. साधना : नामजप, स्वभावदोष निर्मूलन, अहं-निर्मूलन आणि भावजागृती. आपत्कालीन उपाय : आयुर्वेदीय उपचार, नामजप आणि प्रथमोपचार.

आपत्काळात मार्गदर्शक ठरणारे ग्रंथ !   पूर्वीच्या ऋषींनी वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आदींसारख्या धर्मग्रंथांद्वारे विपुल लिखाण करून ठेवले आहे. या धर्मग्रंथांतील सध्याच्या काळाला आवश्यक असे विषय आणि लिखाण सनातनच्या ग्रंथांमध्ये घेण्यात येतात. येणारा काळ आपत्काळाचा आहे. अशा वेळी हे ग्रंथच मार्गदर्शक ठरतील. प्रत्येकाने आपल्या घरी हे ‘चैतन्यमय ग्रंथ’ संग्रही ठेवून त्यानुसार आचरण करणे, हीच खरी गुरुसेवा ठरेल

संकलक : श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्थ

00000

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची विशेष सुविधा

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरातून लाखो नागरिकांना दिलासा महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन!चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन..

vishwatmaklokswamivarta

📢 महत्वाची सूचना – किल्ले रायगडावर पायरी मार्ग बंद!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जिल्हा नियंत्रण कक्षास भेट-आपत्तीच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता तात्काळ उपाययोजना राबवा- उपमुख्यमंत्रीआपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा- उपमुख्यमंत्री