vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते .डॉ. वाकोडे यांच्या रुग्ण सेवेचा रावणकर हॉस्पिटल येथे शुभारंभ

कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते .डॉ. वाकोडे यांच्या रुग्ण सेवेचा रावणकर हॉस्पिटल येथे शुभारंभ

 

अकोला : डॉ. मोनिष वाकोडे आणि डॉ. नेहा फाटे (वाकोडे) यांच्या डॉ. रावणकार मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथील सेवेचा शुभारंभ राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड आकाश फुंडकर यांच्या हस्ते आज झाला.

अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह उत्तमोत्तम आरोग्य सेवा येथे उपलब्ध झाल्या आहेत. डॉ. वाकोडे दांपत्याच्या रुग्णसेवेचा गरजू रुग्णांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. मोनिष वाकोडे आणि डॉ. नेहा फाटे (वाकोडे), डॉ. दीपक मोरे, दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वर फुंडकर,तुकाराम वाकोडे,डॉ. शंकरराव वाकोडे,इंजि. गजानन फाटे,अॅड. विनोद फाटे,डॉ. अमोल रावणकार आदी उपस्थित होते.

 मधुमेह,उच्च रक्तदाब,हृदयविकार,दमा व श्वसन विकार, थायराईड विकार,किडनी विकार,ताप व संसर्गजन्य आजार,स्ट्रोक व आपातकालीन उपचार,लिव्हर चे आजार ,विषबाधा व सर्पदंश,२४ तास अत्यावश्यक सेवा,अतिदक्षता विभाग उपलब्ध करण्यात आल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.

०००

संबंधित पोस्ट

अल-निनोच्या जनजागृतीसाठी कृषी विभागाच्या गावोगावी 13 हजार गाव बैठकांचे आयोजन 

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

 जिल्हा परिषद, ठाणे राज्यात प्रथम क्रमांकावर; ‘कार्यालयीन मूल्यमापन’ मोहिमेत मिळवला गौरव-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन केंद्र उपयुक्त ठरेल- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अग्निशमन केंद्र, कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

कृषि समुद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अभिनेता रणवीर सिंह यांनी श्री चामुंडी दैवाला भूत म्हणून अवमान केल्याचे प्रकरण हिंदु जनजागृती समितीकडून अभिनेता रणवीर सिंह यांच्या विरोधात पोलीस तक्रार !

vishwatmaklokswamivarta