vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना समाचारच्या नावाचा गैरवापर, बनावट जेपीजी तयार करून, सोशल मिडीयावर व्हायरलअज्ञात व्यक्तीचा शोध लावून गुन्हा दाखल करावा- संपादक विकासकुमार बागडी

जालना समाचारच्या नावाचा गैरवापर, बनावट जेपीजी तयार करून, सोशल मिडीयावर व्हायरलअज्ञात व्यक्तीचा शोध लावून गुन्हा दाखल करावा- संपादक विकासकुमार बागडी

जालना/प्रतिनिधी,जालना जिल्ह्यातून प्रकाशित होणार्‍या जालना समाचार वृत्तपत्राचे वर नांव लावून खाली बनावट वृत्तपत्राची जेपीजी फाईल तयार करून सोशल मीडियावर दुसर्‍याचे बदनामीकारक मजकूर व्हायरल करणार्‍या अज्ञात व्यक्तीचा शोध लावून त्याच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी जालना समाचारचे संपादक विकासकुमार बागडी यांनी केली आहे.

याबाबत सदर बाजार पोलिस ठाण्याचे प्रमुख भारती यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जालना समाचार या वर्तमानपत्राचा मालक मी मालक, मुद्रक, संपादक आहे. अज्ञात व्यक्तीने जालना समाचार वर्तमानपत्राच्या नावाचा गैरवापर करून बनावट जे.पी.जी. तयार केली आहे. सदर जेपीजीमध्ये जालना शहरातील व्यापारी सुभाष देवीदान, पार्श्‍वभुमीचे संपादक दिलीप राठी यांचे कार्टून व बदनामीकारक मजकूर टाकून सोशल मीडियावर व्हायरल केले.

त्या पोस्टशी जालना समाचार वृत्तपत्राचा कोणताही संबंध नाही. अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक जालना समाचारची फसवणुक केली. तसेच प्रतिष्ठीत व्यापारी व संपादक यांची बदनामी करीता सोशल मीडियाचा गैरवापर करून खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरविण्यात य आली आहे. या प्रकरणाची सायबर सेलमार्फत सखोल चौकशी करून संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा व त्याच्यावर भारतीय न्याय संहिता , माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच लागू असलेल्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही संपादक विकासकुमार बागडी यांनी केली आहे.

0000

संबंधित पोस्ट

वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आर्वी येथे नवीन प्रशासकीय इमारतीसह विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यास यंत्रणा सज्ज- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात 17 ऑगस्टपर्यंत ‘तिरंगा आणि वंदे मातरम्’ विषयक माहितीपूर्ण प्रदर्शन

रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्समध्ये ‘चीज अनालॉग’ वापराबाबत अन्न व औषध विभागाच्या सूचना जाहीर-नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा