vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्याबुबळी तलावातील गाळ काढण्यास सुरूवात

सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्याबुबळी तलावातील गाळ काढण्यास सुरूवात

नाशिक, प्रतिनिधी: सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बुबळी तलावातील गाळ काढण्याच्या कामाला नगरपंचायतीच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. यामुळे सुरगाणा शहरासह परिसरातील १२ खेडी व पाड्यांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर दिलासा मिळणार आहे.

सुरगाणा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुभाष जानोरे, माजी नगराध्यक्ष तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बुबळी तलावातील गाळ काढण्याबाबत चर्चा झाली. तलावाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे आवश्यक असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नमो फाऊंडेशनला आवश्यक कार्यवाहीसाठी पत्र व्यवहार केला. त्यानंतर सुरगाणा नगरपंचायतीने जलसंपदा विभागाशी समन्वय साधून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामास सुरुवात केलीबुबळी तलाव हा सुरगाणा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा स्रोत आहे. गेल्या काही वर्षांत तलावात गाळ साचल्याने साठवण क्षमतेत घट झाली होती. त्यामुळे उन्हाळ्यात शहरासह परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत होती. आता गाळ काढण्याच्या कामामुळे तलावाची साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून भविष्यात पाणीपुरवठा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नगरपंचायत प्रशासनाने या कामासाठी समन्वय साधत कार्यवाही गतिमान केली असून, काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे

00000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दि.7 जानेवारी रोजी महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

बहाई धर्मगुरू दिव्यात्म बाब यांचा श्रद्धांजलीपर बलिदान दिवस साजरा

भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला.

बांधकाम कामगारांच्या पाठिशी शासन खंबीरपण उभे– कामगार मंत्री आकाश फुंडकर,कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञान आणि शेतकरी हिताचे निर्णय– कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे शिक्षण क्षेत्रात सुविधावाढ व भरती प्रक्रिया गतीमान– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबईतील ओशिवरा बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये लागली आग..

vishwatmaklokswamivarta

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस प्रशासन सतर्क* *मॉक ड्रिल, सागरी व मर्मस्थळ सुरक्षा वाढवली*