vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी केली विविध विकास कामांची पाहणी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महास्ट्राइड’ मूल्यांकन समितीची बैठक

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी केली विविध विकास कामांची पाहणी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महास्ट्राइड’ मूल्यांकन समितीची बैठक

नाशिक, प्रतिनिधी: जागतिक बँक सहायित महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प (महास्ट्राइड) नाशिक जिल्हा मूल्यांकन समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील विविध विकास कामांना भेट देत पाहणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी ही बैठक झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राकेश सेपट, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. धर्माधिकारी, जागतिक बँकेच्या प्रतिनिधी स्वाती डोग्रा, सीमा व्यास, ‘महास्ट्राइडचे’ महाव्यवस्थापक दीपक देशमुख यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात जागतिक बँकेच्या प्रोत्साहनात्मक निधीच्या माध्यमातून होणारी विकास कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतील, अशी ग्वाही देत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, नाशिक जिल्हा कृषी, कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग, औद्योगिक, ऊर्जा निर्मितीसह विविध उत्पादनात अग्रेसर आहे. आगामी काळात नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात रस्ते, रेल्वे, विमानतळ सक्षमीकरण करून पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो. आगामी काळात नाशिक हे वाढवण बंदराशी जोडले जाणार आहे. तसेच निफाड येथे ड्राय पोर्ट विकसित होत आहे. अलिकडेच विविध उद्योजकांशी औद्योगिक गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आले. रिंग रोडच्या माध्यमातून अर्थ व्यवस्थेला चालना मिळणार आहे.

पर्यटन, अध्यात्मिक पर्यटनाला या जिल्ह्यात मोठी संधी आहे. त्यातून रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य या जिल्ह्यात आहे, तर बिबट सफारीचा उपक्रम नियोजित आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) माध्यमातून गेल्या वर्षी ९०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. यावर्षीच्या जानेवारीमध्ये एरो शो, तर मार्चमध्ये कृषी कुंभचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात विकास कामे करताना जागतिक बँकेने केलेल्या सूचनांचा सकारात्मकपणे विचार करण्यात येईल. विकास कामांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची सर्वतोपरी दक्षता घेण्यात येईल. तेथे कामगारांना सुरक्षेची सर्व साधने पुरविण्यात येतील. त्याची कामगार आयुक्तांकडून खात्री करून घेण्यात येईल, असेही असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.

जागतिक बँकेच्या प्रतिनिधी श्रीमती व्यास यांनी सांगितले की, जागतिक बँक शाश्वत विकासासाठी मदत करते. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेली कामे केवळ राज्यासाठी नव्हे, तर देशासाठी मार्गदर्शक अशी आहेत. विकास कामांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशीही सूचना त्यांनी केली. यावेळी श्रीमती डोग्रा यांनीही विविध सूचना केल्या.

 

०००००

संबंधित पोस्ट

वारकर्‍यांच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात आणि संघटन, तसेच विविध प्रश्‍नांसाठी एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड दौरा, ड्रोन व हवाई उपकरणांवर बंदी…

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पदभरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती नाही; विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

सिंधुदुर्गातील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला ६०० मंदिर विश्वस्तांची उपस्थिती! हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – श्री. नितेश राणे, मंत्री, मत्स्य व्यवसाय

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आमदार,माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, त्या आरोपावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे काय म्हणाले ते पहा…या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे अशी मागणी केली आणि….

vishwatmaklokswamivarta

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta