vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

 

सातारा आरोग्य प्रतिनिधी – राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम संपूर्ण जिल्हायामध्ये यशस्वीपणे राबविला जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत राबविल्या जाणा-या कार्यक्रमा अंतर्गत शुन्य ते अठरा वयोगटातील सर्व बालकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. सातारा जिल्हायामध्ये एकुण ३६ आरोग्य तपासणी पथक कार्यरत आहेत. या शस्त्रक्रिया शिबिरामध्ये हार्णिया, फायमोसिस, अॅपेंडीक्स इत्यादी शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थी बालकांच्या पालकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांनी केलेले आहे.

कर्तव्य सोशल ग्रुप सातारा, सायन हॉस्पीटल मुंबई, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैदयकिय महाविदयालय सातारा व स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने १८ पर्यंतच्या वयोगटातील लाभार्थी बालकांचे शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेले आहे. शिबिराचे आयोजन स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण जिल्हा रुग्णालय सातारा या ठिकाणी दिनांक 15 ते 17 मे रोजी आयोजित केलेले आहे. सदर शिबिरामध्ये सायन हॉस्पीटल मधील तज्ञ डॉक्टर डॉ. संजय ओक, डॉ. पारस कोठारी व इतर तज्ञ डॉक्टर उपस्थितीत राहून शस्त्रक्रिया पार पाडणार आहेत.

000

संबंधित पोस्ट

स्टॉप डायरिया” राष्ट्रीय मोहीम ठाणे जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू

नव्या मुंबईतील*रूग्णालयीन सुविधा अधिक गुणवत्तापूर्ण करण्याकडे आयुक्त यांचे विशेष लक्ष*

शालेय विद्यार्थ्यांना उत्तम आहार, उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन चांगलं खा;चांगलं व्हा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

समुदाय प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने भारतभरात सीपीआर जागरुकता सप्ताहाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ साजरा*28 रुग्णांची मोफत ‘इन्हीबिटर’ चाचणी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

राज्यात ५ हजार ४९७ रुग्णांची नोंद; प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित