vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधानपरिषद साठी भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीची शिफारस करा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवेंना निवेदन

विधानपरिषद साठी भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीची शिफारस करा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवेंना निवेदन

 

जालना (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर व जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर मुकुंदराव दानवे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी भाजपा जालना महानगरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकनेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे आज दि. 20 मे २०२६ रोजी जालना येथे निवेदनाद्वारे केली.

 

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भास्कर आबा दानवे हे सलग जालना विधानसभा मतदारसंघात पूर्णवेळ संघटन बांधणीचे कार्य केले आहे. त्यांनी मतदारसंघात भाजपा पक्षाच्या शाखा स्थापन करून पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी जालना नगरपरिषद उपनगराध्यक्ष, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, १०१-जालना विधानसभा प्रमुख तसेच सध्या जालना महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून भास्कर आबा दानवे यांना उमेदवारी मिळावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाकडे शिफारस करावी, अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली व “पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या आणि कार्यकर्त्यांमध्ये मजबूत संपर्क असलेल्या भास्कर आबा दानवे यांना पक्षाने संधी दिलीच पाहिजे,” अशी भावना देखील यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

 

यावेळी राजेश राऊत, अशोक पांगारकर, बद्रीनाथ पठाडे, महेश निकम, संतोष लोखंडे, सोपान पेंढारकर, सतीश जाधव, धनराज काबलिये, अमोल धानुरे, सुनील खरे, संजय डोंगरे, संध्या देठे, सिद्धिविनायक मुळे, शशिकांत घुगे, विजय कामड, आकाश देशमाने, दिपक साळवे, दुर्गेश कुरील, रोहित खोडवे, अर्जुन गेही, संजय भगत, मनोज बिडकर, वसंत शिंदे, अमोल कारंजेकर, सुनील पवार, शिवप्रकाश चितळकर, गोविंद ढेंबरे, राजेंद्र भोसले, परसराम तळेकर, बद्री भसांडे, अनिल सरकटे, राजाराम जाधव, कृष्णा खिल्लारे, गजानन खरात, निवृत्ती लंके, दत्ता जाधव, सतीश केरकळ, सुमित सुरडकर, विष्णू डोंगरे, नंदकुमार ठाकूर, सुधाकर खरात, रामेश्वर शेजूळ, तुकाराम कळकुंबे, शिवाजी गायकवाड, कैलास सोळुंके, हरिभाऊ गोरे, गोवर्धन उबाळे, करण निकाळजे, रवि कायंदे, नागेश अंभोरे, योगेश शिमगे, बाळू कावळे, दांडायित, कृष्णा गायके, विकास कदम, महेश मुळे, सागर वाहूळकर, गौरव गोधेकर, जगदीश खरात, विठ्ठल इंदलकर, शरद सोनुने, उद्धव ढवळे, रामदास गायकवाड, नानासाहेब देव्हडे, सतीश जारे, बाबूलाल चव्हाण, शाम जाधव, लासिराम राठोड, गणेश वाघमारे, लक्ष्मण जाधव, लक्ष्मण राठोड, गजानन घुले, राजू उगले, राजू कळकुंबे, बाबासाहेब चाळगे, बद्री वाघ, राजेश घोडके, मदन गवारे, सत्यनारायण ढोकळे यांच्यासह भाजपा जालना विधानसभेतील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील मृत पावलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला.  

जालन्यातील लक्कडकोट येथील जमीन वादाने पेटले रान; जयश्री कटके यांच्याकडून पोलीस व राजकारण्यांवर गंभीर आरोप

बंजारा समाजाच्या बोलीभाषेचा समावेश 8 व्या अनुसूचीमध्ये करावा- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

आज रंगणार बुद्ध-भीम गीतांची बहारदार मैफील*समाज कल्याण विभागाचा पुढाकार

कोकण विभागातील 51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला “हिंद-दी-चादर” अन् “बोले सो निssहाल” चा जयघोष-बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद….