vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

नवीन 4 कामगार संहितांवर हरकती-सूचना सादर करण्याचे आवाहन

नवीन 4 कामगार संहितांवर हरकती-सूचना सादर करण्याचे आवाहन

 

जालना, प्रतिनिधी : केंद्र शासनाने देशभरात नवीन 4 कामगार संहिता (लेबर कोडस्) लागू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली असून, भारत सरकारने दि. 21 डिसेंबर 2025 पासून या संहितांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र शासनाने औद्योगिक संबंध संहिता-2020, वेतन संहिता-2019, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता-2020 तसेच सामाजिक सुरक्षा संहिता-2020 या चारही संहितांशी संबंधित मसुदा अधिसूचना दि. 28 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध केली आहे.

या मसुद्याबाबत औद्योगिक क्षेत्रातील विविध घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये कामगार संघटना, मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, दुकाने व आस्थापना प्रतिनिधी, मालक संघटना तसेच संबंधित औद्योगिक क्षेत्रातील इतर भागधारकांचा समावेश आहे. शासनाने या सर्वांनी अधिसूचनेचा अभ्यास करून आपले अभिप्राय लेखी स्वरूपात सादर करावेत, असे आवाहन केले आहे.

हरकती अथवा सूचना कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली असून, संबंधितांनी आपले अभिप्राय “कामगार आयुक्त, कामगार भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051 ” या पत्त्यावर पाठवावेत. तसेच mh.labourcodes@gmail.com ई-मेलद्वारेही सूचना नोंदविता येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत म्हणजेच दि. 12 जून 2026 रोजी किंवा त्यापूर्वी हरकती व सूचना सादर करणे आवश्यक राहणार आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह, एक लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता…

कृषी यांत्रिकीकरण योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” योजनेंतर्गत इच्छुक संस्थांना प्रस्ताव सादर करण्याची 10 एप्रिल पर्यंत मुदत…

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

रेल्वे स्टेशन वरील चहा विक्रेत्यांवर वैधमापन शास्त्र विभागाची कारवाई

तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन*18 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यास मुदत