vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डाक अदालत’ चे ( दि.८जून रोजी) आयोजन; तक्रारी नोंदवण्याचे आवाहन

‘डाक अदालत’ चे ( दि.८जून रोजी) आयोजन; तक्रारी नोंदवण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-देशातील पोस्टल सेवा ही नागरिकांच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पोस्ट खाते नेहमीच ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा आणि त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत असते. याचाच भाग म्हणून दि.८ जून २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयात ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे.

सेवा देताना काही वेळा त्रुटींमुळे किंवा संवादामुळे ग्राहकांच्या तक्रारी निर्माण होतात. या तक्रारींचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी ‘डाक अदालत’ घेण्याचे ठरवले आहे. या अदालतीमध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी थेट ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करतात.

छत्रपती संभाजीनगर क्षेत्राशी संबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण गेल्या ६ आठवड्यांच्या आत झालेले नसेल आणि ग्राहकाला समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशाच तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल.विशेषत:टपाल वस्तू (पार्सल/पत्र),मनी ऑर्डर,बचत बँक खाते, प्रमाणपत्रे याचा समावेश आहे.तक्रारदारांनी आपल्या तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलांसह करणे आवश्यक आहे. यामध्ये मूळ तक्रार पाठवलेली तारीख, ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती त्यांचे नाव आणि हुद्दा इत्यादी गोष्टी स्पष्ट असाव्यात.

 श्री भगवान नागरगोजे, सहायक निदेशक डाकसेवा (ज शि), पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, छत्रपती संभाजीनगर,४३१००२. येथे सादर कराव्यात.

 तक्रारीच्या दोन प्रती (Copies) पाठवणे आवश्यक आहे. असे आवाहन प्रवर अधीक्षक, डाकघर ,छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांसाठी शांततेत मतदान,उदगीर नगरपरिषद निवडणुकीत 68.12 टक्के, अहमदपूरमध्ये 73.06 आणि औसा नगरपरिषदमध्ये 75.73 टक्के मतदान…

vishwatmaklokswamivarta

अमृत आणि एम सी ई डी मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

स्वच्छतेसोबतच हवेच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत डीप क्लिनींग मोहीमेचे सर्वत्र आयोजन…

vishwatmaklokswamivarta

इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर

वरंध घाट 30 सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना..

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वा. पर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची नागरिकांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta