vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वच्छतेसोबतच हवेच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत डीप क्लिनींग मोहीमेचे सर्वत्र आयोजन…

स्वच्छतेसोबतच हवेच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत डीप क्लिनींग मोहीमेचे सर्वत्र आयोजन…

 

         नवी मुंबई प्रतिनिधी स्वच्छतेइतकेच पर्यावरणाकडे लक्ष देत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमांना (Deep Cleaning Drive) सुरूवात करण्यात आलेली आहे. या अंतर्गत वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते असे शहरातील मुख्य रस्ते, त्यांच्या शेजारचे पदपथ व मधील दुभाजक यांची बारकाईने सफाई करण्याकडे लक्ष दिले जात आहे. ज्या माध्यमातून रस्ते, पदपथ यांच्या कडेला साचणारी माती, कचरा यांची सफाई होईल व वायू प्रदूषणात घट होईल. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे मार्गदर्शनानुसार 30 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सखोल स्वच्छता मोहीमा (Deep Cleaning Drive) प्रभावीपणे राबविल्या जात असल्याने याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

 या मोहीमांचे 13 जानेवारीपर्यंत नियोजन करण्यात आले असून कोणत्या दिवशी, कोणता रस्ता किंवा कोणत्या परिसराची सखोल साफसफाई करावयाची आहे, त्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्या वेळापत्रकानुसार अगदी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही मोहीमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. संतोष वारुळे तसेच परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या माध्यमातून संबंधित स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक तसेच विभागातील कर्मचारीवृंद व स्वच्छताकर्मी यांच्या सहयोगाने या सखोल स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहे.

  या अनुषंगाने आज 9 जानेवारी रोजी बेलापूर विभागात कोकण भवन ते हायवे ब्रीज पर्यंत व टाटानगर परिसर रस्त्यांची सखोल स्वच्छता सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री. नरेश अंधेर यांच्या नियंत्रणाखाली विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी यांच्या वतीने करण्यात आली.

 कोपरखैरणे विभागात कोपरखैरणे गाव, गावठाण, विस्तारित गावठाण येथील मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.सुनिल काठोळे व स्वच्छता अधिकारी श्री.राजूसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून कर्मचारी व स्वच्छताकर्मी यांच्या सहयोगाने पार पडली. घणसोली विभागात सेक्टर 1 येथील दर्गा ते पामबीच रोडपर्यंत मुख्य रस्त्याची सखोल स्वच्छता सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. संजय तायडे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सतीश सनदी व स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन यांच्या नियंत्रणाखाली विभागीय अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मी यांच्या वतीने करण्यात आली.   अशाच प्रकारे दिघा विभागातही एच विभाग दिघा कार्यालय परिसराची सखोल स्वच्‍छता सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. भरत धांडे व स्वच्छता अधिकारी श्री. प्रवीण थोरात यांच्या नियंत्रणाखाली विभागातील स्वच्छताकर्मी व कर्मचारी यांच्या सहयोगाने करण्यात आली. इतर विभाग कार्यालय क्षेत्रातही सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. काही मोहीमांमध्ये नागरिकांनीही स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला. यापुढील काळात 13 जानेवारीपर्यंत नियोजन केल्यानुसार वातावरणातील धूळीचे प्रमाण कमी करुन हवेची गुणवत्ता वाढविणा-या सखोल स्वच्छता मोहीमा (Deep Cleaning Drive) ठिकठिकाणी राबविण्यात येणार आहेत. 00000000

संबंधित पोस्ट

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेच्यालाभाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

जगात शांततेसाठीचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो – योगगुरू रामदेव बाबा

आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम,नागरिकांसाठी उपयुक् -जिल्हाधिकारी सौरभ कटियार मुंबई उपनगर जिल्ह्यात मोहिमेस उत्साहात सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

शासकीय अधिकाऱ्यांशी परस्पर समन्वयानेसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे-गतिमानता अभियानता उत्कृष्ट अधिकारी उपक्रमांतर्गत पुरस्कार वितरण उत्साहात..

मुंबईकरांना पाणीटंचाई – दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशीच मुंबईकरांना पाणी टंचाई …

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. येथील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय आम्ही घेतला – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख

vishwatmaklokswamivarta