vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयात बीजमोदकांची रांगोळी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयात बीजमोदकांची रांगोळी

     नवी मुंबई प्रतिनिधी     जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्याप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावरील पॅसेजमध्ये ‘झाडे लावा – झाडे जगवा’, ‘बचत पाण्याची – गरज काळाची’ असा संदेश प्रसारित करणारी लक्षवेधी रांगोळी काढण्यात आली होती. या भव्यतम रांगोळीचे वैशिष्ट्य म्हणजे या रांगोळीत विविध रंगाप्रमाणेच 2 हजार बीजमोदकांचा उपयोग करण्यात आला होता.

विविध देशी वृक्षांची बीजे पातळ कपड्यात गुंडाळून व त्यावर मातीचा थर देऊन मोदकाच्या आकाराचे बीजमोदक तयार करण्याची अभिनव संकल्पना प्रभात ट्रस्ट ही सेवाभावी संस्था राबवित असून हे बीजमोदक कुठेही मोकळ्या जागी टाकल्यास त्यातून नैसर्गिकरित्या वृक्षारोपण करण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. विशेष म्हणजे हे बीजमोदक महिला बचत गटांतील महिलांमार्फत तयार केले जात असून या माध्यमातून त्यांनाही रोजगार उपलब्ध होत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने हे 2 हजार बीजमोदक घेऊन त्यापासून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सुप्रसिध्द रंगावलीकार श्री.श्रीहरी पवळे यांच्या माध्यमातून ही आकर्षक बीजमोदक रंगावली साकारली आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी रंगावलीचे अवलोकन करीत या पर्यावरणशील संकल्पनेचे कौतुक केले. यावेळी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, मुख्य विधी अधिकारी श्री.अभय जाधव, प्रभात ट्रस्टचे प्रमुख डॉ.प्रशांत थोरात उपस्थित होते

0000

 

संबंधित पोस्ट

बातमी प्रसिद्धीचा राग मनात धरुन पत्रकार विष्णु कदम यास मारहाण करणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीसीएमची मागणी

vishwatmaklokswamivarta

मुंबईत भूस्खलनाचा धोका असणाऱ्या ठिकाणांचा पुन्हा सर्व्हे करणार- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रामध्ये6, 7 व 9 फेब्रुवारी रोजी मद्य विक्री बंद..

vishwatmaklokswamivarta

गणपती बाप्पा मोरया !! जीएसबी सेवा मंडळाने मिळवले २०२५ च्या गणेशोत्सवासाठी ४७४.६४ कोटी रुपयांचा विमा…

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तरे-कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई